Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने वर्षा शेरकर यांचा सत्कार

बीड : श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था संचलित लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम तसेच जनसेवा व्यसनमुक्ती केंद्राच्या समुपदेशिका वर्षा शेरकर

बीड शहरासाठी दिलासादायक निर्णय; शववाहिका दुरुस्त करून लवकरच सेवेत-शेख निजाम
जनगणना : देशाच्या विकासाचा आरसा आणि नियोजनाचा पाया-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन; बीडमध्ये जनगणना 2027 साठी प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणास आजपासून सुरुवात
महाराष्ट्र दिनापासून मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलनाची तयारी; आज जामा मस्जिद येथे महत्त्वाचा मशवेरा

बीड : श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था संचलित लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम तसेच जनसेवा व्यसनमुक्ती केंद्राच्या समुपदेशिका वर्षा शेरकर यांचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हा सत्कार कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्या. डॉ. सय्यद वाहब यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने वर्षा शेरकर यांना नुकताच ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. वर्षा शेरकर यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात तसेच वृद्धाश्रमातील निराधार व्यक्तींच्या समुपदेशन व पुनर्वसनासाठी केलेल्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे अनेक व्यक्तींना नवजीवन मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव फड होते. तसेच भाजपाचे युवा नेते चंद्रकांत फड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन फड आणि सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वर्षा शेरकर यांच्या कार्याचे कौतुक करत सामाजिक क्षेत्रात अशा कार्यकर्त्यांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आयोजन विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले होते.

COMMENTS