Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी विंधन विहीरचे खोदकाम; नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या वतीने हा उपक्रम

कुंडलवाडी : प्रभाग क्रमांक 9 मधील नाईकवाड गल्ली येथे पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी विंधन विहीर खोदण्यात आली आहे. नगरसेवक प्रदीप गंगाधरराव खुळ

पैशाच्या तगाद्यामुळे व्यक्तीची आत्महत्या; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
कुंडलवाडीत मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता उपद्रव ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कुंडलवाडीत स्मार्ट मीटर बसविण्यावरून नागरिकांत नाराजी
भाजपच्या अधिकृत उमेदवार.. , सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार , भावी  नगराध्यक्षा कुंडलवाडी, नगर परिषद, यांना कमळ या चिन्ह समोरील बटन दाबून  प्रचंड बहुमताने विजयी करा.. , . , #prernakotlawar, #nagaradheksha ...

कुंडलवाडी : प्रभाग क्रमांक 9 मधील नाईकवाड गल्ली येथे पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी विंधन विहीर खोदण्यात आली आहे. नगरसेवक प्रदीप गंगाधरराव खुळगे व सुनिता गंगाधर रूद्रूरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील काही भागांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नगर परिषद निवडणुकी दरम्यान आवश्यक ठिकाणी विंधन विहिरी उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत प्रभाग 9 मधील नाईकवाड गल्ली येथे विंधन विहीर पूर्ण करण्यात आली आहे.याशिवाय हटकर गल्ली ते नाईकवाड गल्ली मध्ये नालीचे बांधकाम केले,व नल्लावार यांच्या घरासमोर व विठ्ठल हाके  यांच्या घरासमोर नालीवर स्लँब टाकण्यात आले आहे.कुंडलेश्वर मंदीर येथील बोअरला नविन मोटार बसविण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांची पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात कमी झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच नगराध्यक्षा व नगरसेवकांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक प्रदीप खेळगे, बडे भाई, अयुब मिस्त्री यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

COMMENTS