ओ.. शेठ… नादच केलाय थेट…. पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते…

Homeताज्या बातम्यादेश

ओ.. शेठ… नादच केलाय थेट…. पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते…

वेब टीम : दिल्लीजागतिक स्तरावरील नेत्यांच्या पातळीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आता परदेशातही होणार लोच्या ; यु.एस., यु.ए.ई.सह अनेक देशांमध्ये ‘लोच्या झाला रे’ होणार प्रदर्शित
पुण्यासाठी ऑक्सिजन आणण्याचा तुघलकी आदेश
निवृत्तीवेतनधारकांची माहिती आता एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत जोडणार ः श्रीनिवास

वेब टीम : दिल्ली
जागतिक स्तरावरील नेत्यांच्या पातळीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत.

‘द मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकन संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. यात ‘ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंग’ मध्ये मोदींना सर्वाधिक 70 टक्के रेटिंग मिळाले आहे.

मोदी यांनी अमेरिकेसह ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडामधील नेत्यांना मागे टाकले आहे.

या सर्वेक्षणात मोदी यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर असून त्यांचे रेटिंग ६४ टक्के आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पाचव्या स्थानी असून त्यांचे रेटिंग ४८ टक्के आहे.

COMMENTS