अफगाणिस्तानात अतिरेक्यांमध्येच झाले वाद… तालिबान – हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी भिडले…

Homeताज्या बातम्याविदेश

अफगाणिस्तानात अतिरेक्यांमध्येच झाले वाद… तालिबान – हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी भिडले…

वेब टीम : काबुलतालिबानने अफगाणवर ताबा मिळावल्या नंतर तिथे अनागोंदीची माजली आहे. अजून सरकार स्थापन होऊ शकले नाही. तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात

मोबाईलपेक्षा मैदानी खेळांना महत्व द्यावे
रणबीर कपूर आणि विकी कौशल मध्ये स्पर्धा
मराठा समाजाने शिर्डीच्या कार्यक्रमाच्या बसेस पाठवल्या रिकाम्या

वेब टीम : काबुल
तालिबानने अफगाणवर ताबा मिळावल्या नंतर तिथे अनागोंदीची माजली आहे. अजून सरकार स्थापन होऊ शकले नाही. तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात सत्तेसाठी सुरू असलेल्या वादामुळे सरकार स्थापन करणे कठीण झाले आहे.

प्रकरण तापल्याने आज रोजी तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचे समर्थक भिडले. यावेळी झालेल्या गोळीबारात तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी झाला.

दोहा येथे झालेल्या शांतता चर्चेत समावेशक सरकार स्थापन करण्याचे आश्वासन तालिबानने दिले होते पण हक्कानी नेटवर्कच्या भूमिकेने तालिबान अडचणीत येते आहे.

तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर अल्पसंख्यक समुहांना सरकारमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी तालिबानचा उपनेता सिराजुद्दीन आणि त्याची दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क मात्र कुणाहीसोबत सत्ता वाटून घेण्याला विरोध करत आहे.

या वादातूनच दोन्ही गटात चकमक उडाली, गोळीबार झाला; यात मुल्ला बरादर जखमी झाला. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा सरकार स्थापन झाले तर मुल्ला बरादर हा देशाचा सर्वोच्च नेता राहील, अशी शक्यता आहे. तो सध्या जखमी आहे!

COMMENTS