हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली… अजितदादा म्हणाले …

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली… अजितदादा म्हणाले …

प्रतिनिधी : मुंबईराज्य विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये दिली. याअगोदर क

राज्य सरकारकडून 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
एक्सपायरी संपलेल्या बाटल्यांवर नवं स्टिकर लावून रेमडेसिव्हीरची विक्री |’१२च्या १२बातम्या’ |LokNews24
महिलेचा आदर करणाऱ्या बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंकडून महिलेचा अपमान

प्रतिनिधी : मुंबई
राज्य विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये दिली. याअगोदर कामकाज पूर्ण करून घ्या, असेही ते म्हणाले.

अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असली तरी अधिवेशन नेमकं कुठं होणार याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात आले होते . मात्र त्यावेळी भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली होती.

यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा आग्रह वाढू लागला आहे. यावेळी अधिवेशन कुठं होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS