Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हडपसरमध्ये सिलेंडरच्या स्फोटाने आगीचे तांडव; ५ दुकाने खाक, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यापर्यंत!

https://www.youtube.com/watch?v=lQ6BqwBGPDE पुण्यातील हडपसर परिसरातून आगीची एक अत्यंत भीषण घटना समोर आली होती. गोंधळे नगर भागात सिलेंडरचा मोठा स

मुंबईत गोरेगाव पश्चिम येथे भीषण आग; स्थानिक नागरिकांमध्ये घबराट, पोलीस तपास सुरू
कामठीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, दहा जखमी ; घरासह लाखोंचे नुकसान
तामिळनाडूत फटाका कारखान्यात भीषण स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू

पुण्यातील हडपसर परिसरातून आगीची एक अत्यंत भीषण घटना समोर आली होती. गोंधळे नगर भागात सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, आगीच्या ज्वाळा थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या.
हडपसरमधील गोंधळे नगर परिसरात कालव्याच्या कडेला असलेल्या एका सोसायटीतील दुकानांना अचानक आग लागली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वडापावच्या दुकानातील सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत ओळीने असलेली ४ ते ५ दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.

COMMENTS