Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊसतोड मजुराचा भाग आगामी काळात अधिकार्‍यांचा भाग म्हणून ओळखला जाईल -संजय भोसलेयेल्डा,चिचखंडी गावातील पोलीस व इंडियन आर्मी मध्ये भरती झालेल्या युवकांचा संजय भोसले यांच्याकडून भव्यदिव्य सत्कार

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा,चिचखंडी या डोंगरपट्ट्यातील युवकांनी घवघवीत यश संपादन केले असून पोलीस इंडियन आर्मी मध्ये निवड झालेल्या यु

आहात तसाच जीवनाचा स्विकार करा आपोआपच जीवन बदलेल-अ‍ॅड.श्रीकांत माळकरमहिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचे उध्दघाटन
अंबाजोगाईत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नव्या इमारतीचे लोकार्पणआ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते उध्दघाटन
अंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संस्थेच्या सर्व 17 जागांची निवडणूक बिनविरोध! ना.पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, ज्येष्ठ नेते अशोकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाला निर्णय

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा,चिचखंडी या डोंगरपट्ट्यातील युवकांनी घवघवीत यश संपादन केले असून पोलीस इंडियन आर्मी मध्ये निवड झालेल्या युवकांना राष्ट्रवादीचे नेते संजय भोसले यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.येल्डा,चिचखंडी हा डोंगरपट्ट्यातील भाग ऊसतोड मजूरांचा भाग म्हणून ओळखला जातो मात्र मागील काही वर्षापासून ऊसतोड मजूर पालकांनी आपल्या पाल्यांना शासकीय सेवेत नोकरी लागावी यासाठी मुलांच्या शिक्षणावर भर दिला ऊस तोडी करत कुठलीही शिकवणी न लावता येथील युवक पोलीस व इंडियन आर्मी भरती साठी अतोनात कष्ट घेत असून त्यांचे हे यश दैदीप्यमान आहे याचे श्रेय त्यांचे आई वडील व त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आहे. आगामी काळात हा डोंगरपट्ट्यातील भाग ऊसतोड मजुराचा भाग म्हणून न ओळखता जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस, इंडियन आर्मी अधिकार्‍यांचा भाग म्हणून ओळखला जाईल असा विश्वास सत्कार समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय भोसले यांनी व्यक्त केला.
येल्डा गावचे गुणाजी बाबुराव खोडवे ( ठाणे पोलीस), गोविंद विजय खोडवे (नागपूर पोलीस), कृष्णा अंगद शेंडगे (नागपूर पोलीस), प्रदीप प्रल्हाद सातपुते (मुंबई पोलीस), रावसाहेब रणखांब गडदे (इंडियन आर्मी), व चिचखंडी येथील सुनील बालासाहेब गडदे यांची मुंबई पोलीस म्हणून निवड झाली व राजेवाडी गावचे उपसरपंच ड रंजीत गडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय भाऊ भोसले यांनी सर्वांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत विद्यमान सरपंच सचिन करणर, चिचखंडी गावचे सरपंच निळकंठ गडदे, ग्रामपंचायत सदस्य राम खोडवे, राजेवाडी चे युवा नेते दादा सुरवसे, माजी सरपंच बाबुराव सोन्नर ,राजेश खोडवे सर, माजी सरपंच हरीश फुगणर, राजेश देवकते सखाराम सोन्नर, बालासाहेब चामणर नागपूर पोलीस, अण्णा खोडवे, तानाजी चामणर, अशोक खोडवे, विजय खोडवे, बालासाहेब गडदे, राम गडदे, बाबुराव गडदे, तुकाराम गडदे, औदुंबर गडदे, बाबा गडदे, शहाजी सोन्नर, ड सतीश खोडवे, रामलिंग देवकते, करण खोडवे, दिनेश खोडवे, वाळीव वाघमोडे, हनुमंत शिंदे, बाळू कुरे, राहुल गडदे, देविदास देवकते माजी सरपंच कुरणवाडी, रणखांब गडदे, हमीद चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS