Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आप पक्ष फुटीनंतर पंजाबमध्ये राजकीय संघर्ष तीव्र;हरभजनसिंगची वाय श्रेणीची सुरक्षा राज्य सरकारने काढली

चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पार्टी (आप)मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी वेगळा म

ऑपरेशन लोटस की केजरीवालांची मनमानी?
पंजाब वाचवण्याचे आपसमोर आव्हान ?
‘आप’मधील फूट आणि नवे समीकरण !
पंजाब सरकार ने हरभजन सिंह की सुरक्षा वापस ली, राजनीतिक हलचल तेज, उठे गंभीर  सवाल #PunjabPolitics #HarbhajanSingh #AAP #BJP

चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पार्टी (आप)मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी वेगळा मार्ग स्वीकारल्याच्या दाव्यांनंतर राजकीय घडामोडींना अचानक वेग आला असून, या संघर्षात सुरक्षा यंत्रणा आणि सत्ताकेंद्रांमधील तणावही उघडपणे समोर येऊ लागला आहे.
या पार्श्‍वभूमीवर माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पंजाब सरकारकडून देण्यात आलेली ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा अचानक काढून घेण्यात आली. जालंधर येथील त्यांच्या निवासस्थानी तैनात असलेले पोलिस जवानही तातडीने परत बोलावण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर लगेचच केंद्र सरकारने हस्तक्षेप करत केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून सुरक्षा उपलब्ध करून दिली. त्यामुळे राज्य आणि केंद्र यांच्यातील राजकीय मतभेद अधिक ठळक झाले आहेत. पक्षातून बाहेर पडणार्‍या गटाचे नेतृत्व केल्याचा दावा करणारे राघव चढ्ढा यांनी सात खासदार आपल्या सोबत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या सुरक्षेतही यापूर्वी कपात करण्यात आली होती, आणि त्यानंतर त्यांनाही केंद्राकडून संरक्षण देण्यात आले होते. या घटनांमुळे पक्षात मोठी फूट पडल्याचे संकेत अधिक स्पष्ट होत आहेत. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा दावा राज्यसभा खासदार विक्रमजीत साहनी यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली होती. सुरुवातीला ते त्यासाठी तयार होते, मात्र सल्लागारांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. पंजाबची स्थिती ‘आयसीयू’मध्ये असल्यासारखी असल्याचे सांगत, राज्याला स्थैर्यासाठी केंद्राच्या मजबूत सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बंडखोर खासदारांवर उपरोधिक टीका केली असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची वेळ मागितली आहे. पक्ष बदलणार्‍या खासदारांवर ‘राईट टू रिकॉल’सारखी कारवाई करण्याची मागणी करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

बंडखोर खासदारांच्या घरांसमोर कार्यकर्त्यांचे निदर्शने
या बंडाचे पडसाद तळागाळातही उमटले आहेत. जालंधर, लुधियाना आणि फगवाडा या शहरांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी बंडखोर खासदारांच्या घराबाहेर निदर्शने केली. काही ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी ‘गद्दार’ अशी घोषवाक्ये लिहून निषेध व्यक्त केला. या घटनांदरम्यान पोलिस उपस्थित असले तरी मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.

राघव चड्डाच्या फॉलोअर्स 14 लाखांनी घटले
सोशल मीडियावरही या राजकीय उलथापालथीचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे. विशेषतः तरुण मतदारांमध्ये नाराजीची भावना वाढत असल्याचे संकेत मिळत असून, काही नेत्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये घट झाल्याचेही समोर आले आहे. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चढ्ढा यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये सुमारे 14 लाखांची घट झाल्याचे समोर आले आहे. तज्ञांच्या मते, ही तरुण मतदारांची प्रतिक्रिया असू शकते.

COMMENTS