मंदिरांच्या माध्यमातून ऋणानुबंध जोडले जातात – राज्यमंत्री आदिती तटकरे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

मंदिरांच्या माध्यमातून ऋणानुबंध जोडले जातात – राज्यमंत्री आदिती तटकरे

अहमदनगर प्रतिनिधी - समाजाच्या आशीर्वादामुळे व संस्कारामुळे मी घडले आहे.कमी वयातच समाजाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. समाजामध्ये विविध प

अकोले शहरातील गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे : मच्छिंद्र मंडलिक
स्नेहलता कोल्हेंच्या पाठपुराव्यामुळे चार रस्त्यांच्या कामांना मान्यता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसचा दबदबा

अहमदनगर प्रतिनिधी –

समाजाच्या आशीर्वादामुळे व संस्कारामुळे मी घडले आहे.कमी वयातच समाजाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे,आपला समाज राज्यामध्ये दुर्गम भागांमध्ये ओसला आहे. समाजाचे सर्व प्रश्न जाणून घ्यायचे होते परंतु कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे त्यांच्यापर्यंत जाता आले नाही आता मी राज्याचा दौरा करणार आहे या दौऱ्यादरम्यान सर्वांचे प्रश्न जाणून घेणार आहे. नगर शहरातील आमच्या समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम आ.अरुणकाका जगताप व आ.संग्राम जगताप करत आहेत ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे.संतगुरु सिदाजी आप्पा यांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी आ.अरुणकाका जगताप यांनी केलेले कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. मंदिराच्या माध्यमातून ऋणानुबंध जोडले जातात,समाजाने केलेला सत्कार माझ्यासाठी भूषणव आहे. सारसनगर भागांमध्ये आ.जगताप यांनी सर्व समाजाची धार्मिकता व अध्यात्मिकता वाढण्यासाठी मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिलेले कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

नगर शहर व भिंगार वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा समाजभूषण,कर्तव्यसंपन्न ‘लेकीचा’ सन्मान सोहळा करताना आ.अरुणकाका जगताप,आ.संग्राम जगताप,नगरसेवक प्रकाश भागानगरे,प्रा.माणिकराव विधाते, संजय चोपडा, नगरसेविका सुवर्णाताई गेंनप्पा,भाऊ हुच्चे,सठवाप्पा गेन्नाप्पा,दादा मिसाळ,आप्पासाहेब बारसे,पै.सुभाष भागानगरे,चंद्रकांत औशिकर,पै.सतिष हारबा,रखमाजी निस्ताने,विष्णुशेठ कलागते,ठकप्पा लंगोटे,दत्तात्रय नागापुरे,हिरामण बेद्रे,बुधाजी उन्हाळे,राहुल हारबा,चंदू लालबोंद्रे,शाहू लंगोटे,छबुराव कांडेकर,बापूसाहेब ओव्हाळ,दरेकर तात्या म्हस्के,अरुण गाडळकर,नारायण इवळे,राजुशेठ ससाणे,शंकर पगुडवाले,रामभाऊ हुचचे,बहिरट मेजर,सोमनाथ शहापुरकर,विशाल भागांनगरे, सचिन दिवटे,बंडू लंगोटे,अनिल हारबा,भाऊ खताडे,विश्वास जोमीवळे तसेच आधी समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की,संतगुरु सिदाजी आप्पा यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.मनुष्य कितीही मोठया शिखरावर गेला असला तरी त्याला आपले संस्कार विसरून चालणार नाही, भविष्यातील आपली पिढी सुसंस्कृत वाढण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे.सारसनगर परिसरामध्ये गवळी समाजाने एकत्रित येऊन संतगुरु सिदाजी आप्पा यांचे भव्यदिव्य मंदिर उभे केले आहे. मंदिराच्या माध्यमातून समाज एकत्रित येण्याचे काम होते व विचारांची देवाण-घेवाण होती असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की, आमच्या समाजाचे भूषण व कर्तव्य संपन्न राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा सत्कार करण्यात आला समाजाची ‘लेक’ मोठ्या पदावर जाऊन समाजाचे प्रश्न सोडवित आहे याचा आम्हला अभिमान आहे.

COMMENTS