Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोक्यात फरशी घालून पित्याची हत्या; मारेकरी मुलगा जेरबंद ; राहात्यातील घटना 

राहाता : दारूच्या नशेत मुलाने बापाच्या डोक्यात फरशी टाकून पित्याला ठार मारण्याचा प्रकार राहता शहरात शुक्रवारी रात्री घडल्याने नागरिकांमध्ये भीतीच

पाथर्डीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन लाखांची फसवणूक 
अवघ्या दोनशेच्या स्टॅम्पवर व्यावसायिक वीज कनेक्शन; शेतकऱ्यांना मात्र महिनोन्‌महिने प्रतीक्षा; कोपरगावात महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
सोनईत शेतातून कांदा व मोटार चोरी
Friendship made from app woman is tortured by showing job lust in Shirdi,  fake police arrested | अॅपवरुन केलेली मैत्री महागात, नोकरीचं अमिष दाखवून  महिलेवर अत्याचार, तोतया पोलिस जेरबंद

राहाता : दारूच्या नशेत मुलाने बापाच्या डोक्यात फरशी टाकून पित्याला ठार मारण्याचा प्रकार राहता शहरात शुक्रवारी रात्री घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बापाला ठार मारणाऱ्या मुलाला पोलिसांनी तात्काळ अटक करून त्याला जेरबंद केले आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव उत्तम खैरे आहे. राहाता शहरात घोलप मंगल कार्यालय शेजारील परिसरात एका मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मुलगा सचिन खैरे हा आपल्या वडील उत्तम खैरे यांना वारंवार मारहाण करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. कुटुंबातील वाद आणि सततचा त्रास यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण असल्याचीही माहिती समोर येत आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास, आरोपी सचिन खैरे हा दारूच्या नशेत होता. यावेळी त्याने संतापाच्या भरात वडील उत्तम खैरे यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केली. या भयानक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ राहाता पोलिस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक लेंडे व कोमल कुमावत यांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ आरोपी सचिन खैरे याला ताब्यात घेतले आहे. मृतदेह पंचनामा करून पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांकडून तपास सुरू असून, नेमके कारण काय याचा शोध घेतला जात आहे. कुटुंबातील वाद, दारूचे व्यसन आणि सततचे भांडण हे या घटनेमागील कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत राहाता पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

COMMENTS