अहमदनगर जिल्ह्यातील धरण क्षेत्राला जोरदार पावसाची प्रतीक्षा; गेल्यावर्षीपेक्षा सव्वादोनशे मिमी कमी पाऊस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील धरण क्षेत्राला जोरदार पावसाची प्रतीक्षा; गेल्यावर्षीपेक्षा सव्वादोनशे मिमी कमी पाऊस

अहमदनगर/प्रतिनिधी- जून-जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. आता पावसाळ्याचा एकच महिना उरला आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 230 मिली मीटर पाऊस क

आदिवासी महिलेला शिवीगाळ करणार्‍या पोलिसावर कारवाई
धोत्रे ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण गुणवंत विद्यार्थिनी श्रावणीच्या हस्ते उत्साहात
गोरक्षनाथ गडावर ७ जूनला जलउत्सव व दररोजच्या महाप्रसादाचा प्रारंभ

अहमदनगर/प्रतिनिधी- जून-जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. आता पावसाळ्याचा एकच महिना उरला आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 230 मिली मीटर पाऊस कमी झाला आहे. भंडारदरा, मुळा या धरणक्षेत्रातही पाऊस कमी पडला. त्यामुळे ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी वाट पाहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, भविष्यात जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास उत्तर नगर जिल्ह्यावर पाणी संकट ओढावण्याची शक्यता आहे.
मागील सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेवगाव, पाथर्डी व नगर तालुक्यात दाणादाण उडाली. या भागात पावसाने अतोनात नुकसान केले आहे. मात्र, जिल्ह्याच्या इतर भागात हा पाऊस अल्प प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सोमवारी झालेल्या जोरदार पावसानंतर दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. यंदा सरासरी पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात जिल्ह्यात सरासरी 376 मिली मीटर पाऊस पडला आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यात आजपर्यंतचा पाऊस 300 मिली मीटरपेक्षा कमी आहे. नगर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, अकोले, श्रीरामपूर व राहाता या सात तालुक्यांनी पावसाची 300 मिली मीटरची सरासरी ओलांडली आहे. पावसाळयातील अखेरचा सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अन्यथा, खरीप पिकांसारखेच रब्बी पिकांसमोर संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणक्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. परिणामी, मुळा धरण 85 तर भंडारदरा धरण 90 टक्के भरले आहे. मागील तीन महिन्याचा पाऊस मिमीमध्ये- नगर 301.7, पारनेर 271.9, श्रीगोंदा 242.7, कर्जत 285.6, जामखेड 389.6, शेवगाव 313.6, पाथर्डी 326.5, नेवासा 297.1, राहुरी 281.9, संगमनेर 231, अकोले 360.6, कोपरगाव 284.6, श्रीरामपूर 7.8, राहाता 315. जिल्ह्यात सात तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव या सात तालुक्यात आतापर्यंतचा पाऊस 300 मिली मीटरपेक्षा कमी आहे. हे तालुके जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

COMMENTS