जालन्यात 7 कामगारांचा होरपळून मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्यात 7 कामगारांचा होरपळून मृत्यू

स्टील कंपनीत भीषण स्फोट : मृतांचा आकडा वाढण्याची भीती

जालना प्रतिनिधी - जालना शहरातील नवीन औद्योगिक वसाहतीमधील एका स्टील कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे शहर हादरले. या स्फोटात 7 कामगारांचा होरपळून मृत्यू

देशमुख यांना दिलासा ; एक याचिका फेटाळली; लोकप्रियतेसाठी स्टंट
रचना आणि पुनर्रचना
वनवास संपला! अय्यर सोडून बबिता ने जेठालालला मिठी मारली,

जालना प्रतिनिधी – जालना शहरातील नवीन औद्योगिक वसाहतीमधील एका स्टील कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे शहर हादरले. या स्फोटात 7 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक कामगार यामध्ये जखमी झाले आहेत.
जालना औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत मंगळवारी सकाळच्या सुमारास स्टील वितळवणार्‍या भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले. यात 7 कामगारांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.  हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले. तर अनेक कामगार गंभीररित्या जखमी झाले असल्याची देखील माहिती समोर आली आहे.  जे कामगार गंभीररित्या भाजले गेले आहेत. यामध्ये काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेतील जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गीताई स्टील फॅक्टरी स्फोट झाला तेव्हा 50 कामगार काम करत होते. सकाळी 11 वाजता अचानक मोठा आवाज झाला. फॅक्टरीतील बॉयलर फुटला. त्याचे तुकडे तुकडे झाले आणि उष्ण द्रव कामगारांच्या अंगावर उडाला. 7 कामगारांच्या होरपळून मृत्यू झाला.घटनास्थळी जालना पोलिस पोहोचले असून त्यांना तपास सुरू केला आहे. बॉयलरचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा देखील शोध घेण्यात येत आहे. जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षतेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अनेक भीषण स्फोट घडत आहेत. यात अनेक कामगार मृत्युमुखी पडले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा कारवाईची मागणी केली. मात्र, याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप होत आहे.

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर – या घटनेमुळे जालना औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर आला आहे. कामगारांच्या सुरक्षितेच्या प्रश्‍नावर कंपन्यांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. मागील काही दिवसांत अनेक कंपन्यांमध्ये स्फोट होऊन अनेक कामगार जखमी, आणि मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अनेक संघटनांनी आवाज उठविला. परंतु, प्रशासन ढिम्मच आहे. कंपनी व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे अशा घटनाकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

COMMENTS