जगातील सर्वाधिक होरपळणारी शहरे भारतात ! 

Homeअहमदनगरमुंबई - ठाणे

जगातील सर्वाधिक होरपळणारी शहरे भारतात ! 

    जगातील २० सर्वात उष्ण शहरांपैकी १९ शहरे सध्या भारतात असल्याने, भारत जगाची वाढत्या तापमानाची राजधानी बनला आहे. या निष्कर्षांमधून या महिन्यात 

डॉ.उपाध्ये यांची कथा विद्यार्थ्यांना जागृत करणारी ः  द.सा. रसाळ
VIRAL VIDEO: भाऊंनी PPE किट घालून वरात गाजवली | पहा Lok News24*
खासदार चव्हाणांच्या निधनाने काँग्रेसचा लढवैय्या नेता हरपला ः आमदार थोरात

    जगातील २० सर्वात उष्ण शहरांपैकी १९ शहरे सध्या भारतात असल्याने, भारत जगाची वाढत्या तापमानाची राजधानी बनला आहे. या निष्कर्षांमधून या महिन्यात  उष्णतेच्या संकटाची अभूतपूर्व व्याप्ती या अहवालाने नमूद केली आहे. ज्यामध्ये बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील काही शहरे या जागतिक तापमानवाढ दर्शविणाऱ्या यादीत जाऊन बसले आहेत. २२ एप्रिल २०२६ ला एक्यूआय या हवामानाची नोंद घेणाऱ्या आणि पाहणी करणाऱ्या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही नोंद केली आहे. पर्यंतच्या जागतिक उष्णतेच्या क्रमवारीत भारताचे वर्चस्व असून, पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर, बर्दवान, खरगपूर आणि दुर्गापूर, तसेच छत्तीसगडमधील बिलासपूर ही सर्वात उष्ण शहरे म्हणून सूचीबद्ध आहेत. तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. जगातील २० सर्वात उष्ण शहरांपैकी किमान १९ शहरे सध्या भारतात असून, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे.  या यादीत बिहारमधील भागलपूर, ओडिशामधील तालचेर आणि पश्चिम बंगालमधील आसनसोल अग्रस्थानी आहेत. या प्रत्येक ठिकाणी ४४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले, जे माहिती संकलित केली जात असताना पृथ्वीवरील सर्वाधिक तापमान होते. यानंतर लगेचच बिहारमधील इतर अनेक शहरे  बेगुसराय, मोतिहारी, मुंगेर, भोजपूर आणि सिवान तसेच पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशातील ठिकाणे आहेत, जिथे तापमान सुमारे ४३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. एकूणच भारतातील तापमान वाढीचा परिणाम भारतीय जीवनमानात दिसून येत आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने देखील उष्णतेची एस‌ओपी तयार केली आहे. राज्य सरकारच्या नवीन एस‌ओपी धोरणानुसार १२ ते ४ या वेळेत असंघटित क्षेत्रातील मजुरांना विश्रांती देण्याचा नियम केला आहे. अर्थात, या नियमाची किती अंमलबजावणी होईल, हा वेगळा मुद्दा आहेच भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे की, २२ ते २४ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये कमाल तापमान आणखी वाढून ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जेव्हा पारा ४० अंश सेल्सिअस ओलांडतो, तेव्हा आयएमडी अधिकृतपणे उष्णतेची लाट जाहीर करते.उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात एकाच वेळी झालेली वाढ ही काही वेगळ्या प्रादेशिक घटना नसून, जगाच्या हवामान बदलाच्या व्यापक परिणामांचा तो भाग आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, उपखंडावर एकाच वेळी परिणाम करणाऱ्या अनेक परस्परसंबंधित घटकांच्या एकत्रित परिणामामुळे ही तीव्र उष्णता निर्माण झाली आहे.मान्सूनपूर्व तीव्र उष्णतेच्या लाटांमुळे देशाच्या मोठ्या भागातील जमिनीचा पृष्ठभाग वेगाने तापत आहे, असे अहवालात म्हटले आहे. उत्तर आणि मध्य भारतातील निरभ्र आकाशामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट होत आहे, ज्यामुळे अखंड सूर्यप्रकाश जमिनीचे तापमान आणखी वाढवत आहे. युरेशिया आणि हिमालयातील हिवाळी हिमवृष्टीच्या कमतरतेमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे एकाच देशात इतक्या मोठ्या संख्येने विक्रमी तापमानांची नोंद होणे, हे हवामानातील वाढत्या अस्थिरतेचे स्पष्ट द्योतक आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे, असे अहवालात म्हटले आहे. हा कल भविष्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता या दोन्हींमध्ये वाढ होण्याचे संकेत देतो.दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये अवकाळी हिमवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, शेकडो गुज्जर आणि बकरवाल जमातींनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, जम्मू आणि काश्मीरच्या चिनाब खोऱ्यातील उंच कुरणांकडे आपले शतकानुशतके चालत आलेले द्विवार्षिक स्थलांतर सुरू केले आहे.जगाच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या युध्दांचा देखील या तापमान वाढीवर परिणाम होतो आहे. युध्दात मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र वापरली जात आहेत. परिणामी, किरणोत्सर्ग होऊन तापमानात बदल होत आहे.

COMMENTS