https://www.youtube.com/watch?v=wHlD1ZoJuWk नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात नाल्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाल
नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात नाल्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, देगलूर नाका भागात खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. परिसरातील काही मुलं खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेली असता, खेळता खेळता ते पाण्यात पडले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही मुलं बुडाल्याची भीषण घटना घडली.

COMMENTS