Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘भीमशक्ती’ संघटनेकडून विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तके वाटप

 राहाता : तालुक्यातील खडकेवाके व निर्मळ पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

ओबीसी समाजासाठी सदैव लढणार : मंत्री भुजबळ  
प्रादेशिक नळ पाणीपुरवठाचे कर्मचारी उद्यापासून संपावर ;कंत्राटी कामगार संघटनेचा इशारा; वेतन व सुविधांअभावी आंदोलनाचा निर्णय
राहुरी पोटनिवडणूक ऐन रंगात ! कमळाला हवी प्राजक्त तनपुरे यांची साथ?

 राहाता : तालुक्यातील खडकेवाके व निर्मळ पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी संघटनेच्या वतीने यंदा विशेष उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तके वाटप करण्यात आली.   

 याप्रसंगी बोलताना भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ डोक्यावर न घेता त्यांचे विचार नवीन पिढीने डोक्यात घेऊन समजून घेतले पाहिजेत. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा मूलमंत्र आजही तितकाच महत्त्वाचा आहे. खडकेवाके मुख्य शाळा, पोकळे वस्ती, मुजमुले वस्ती तसेच रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, पिंपरी निर्मळ येथे ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली.

जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदेश गायकवाड यांनी, “पुस्तकांशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांना बाबासाहेबांचे विचार व संविधानातील मूल्ये समजतील, हीच खरी आदरांजली ठरेल,” असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे व कदम यांनी केले. यावेळी पवन गायकवाड, कैलास मुरादे, अरुण गायकवाड, ऋषी गायकवाड, अक्षय गायकवाड, संतोष गायकवाड, नवनाथ मुजमुले, बाबासाहेब गायकवाड, सचिन गायकवाड, संदीप लावरे, नवनाथ गायकवाड, वाल्मीक गायकवाड, मुख्याध्यापक संजय कुदळे, प्रीती नरवडे, पांडुरंग सदगीर, हरिभाऊ मोरे, संदीप वाघमारे, दिनेश राठोड, विनोद बनसोडे, शेख,  पिलगर, राहुल बिहानी यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

COMMENTS