Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माहूर येथे खीरदान कार्यक्रम उत्साहात

माहूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर श्री दत्तकृपा प्रतिष्ठान

श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये ‘भक्तीपंढरी’ अवतरणार; संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळा
भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ उपक्रम मानवतेचा जिवंत संदेश-सुनील राणे
भुकेल्यांच्या ताटात माणुसकीचा घास!परळीमध्ये ग्लोबल विकास ट्रस्टच्या मोफत अन्नछत्र सेवेचा शुभारंभ

माहूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तहसील कार्यालयाच्या गेटसमोरील स्व. पिपळीबाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रशांत भाऊ राठोड यांनी उभारलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला. प्रतिष्ठानचे संचालक विजय भाऊ कांबळे यांच्या वतीने दिवसभर नागरिकांना खीरदान करण्यात आले. माहूर शहरात अन्नदानासाठी प्रसिद्ध असलेल्या या प्रतिष्ठानच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून खीरप्राशन केले आणि जयंती उत्सवात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सभापती संजय राठोड, शिवसेना तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक, भाजपचे डॉ. निरंजन केशवे, अनिल वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, पत्रकार विजय आमले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुंदन भाऊ राठोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी अभिवादन  करण्यात आले असून भव्य मिरवणुकीद्वारे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

COMMENTS