Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘गतिमान महाराष्ट्राचा शिल्पकार’ पुस्तकाचीजिल्हा माहिती अधिकारी काझी यांना भेट

बुलडाणा : जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी यांची नुकतीच दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी सदिच्छा भेट घेतली. या

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांची डॉ. अशोक सोनवणे यांची भेट
भारताचा असामान्य अभियंता ‘भारतरत्न’ ठरावा !
डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या कार्याची घेतली दखल

बुलडाणा : जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी यांची नुकतीच दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी सदिच्छा भेट घेतली. या औपचारिक भेटीत डॉ. अशोक सोनवणे यांनी संपादित केलेले ‘गतिमान महाराष्ट्राचा शिल्पकार’ या पुस्तकाची भेट दिली.
जिल्हा माहिती अधिकारी काझी यांच्या या सदिच्छा भेटीत डॉ. सोनवणे यांनी माध्यमांतील बदल, प्रशासन आणि माध्यम क्षेत्रातील समन्वय, माहिती प्रसारणाची भूमिका तसेच समाजाभिमुख पत्रकारितेचे महत्त्व या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
भेटीदरम्यान डॉ. अशोक सोनावणे यांनी स्वतः संपादित केलेले ‘गतिमान महाराष्ट्राचा शिल्पकार’ हे पुस्तक यासेरोद्दीन काझी यांना भेट म्हणून दिले. या पुस्तकामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील कोहिनूर तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्यावर आधारित लेखांचे संपादन केलेेले आहे. पुस्तकाच्या माध्यमातून राज्याच्या पायाभूत सोयी-सुविधा आणि सर्वांगीण विकासाची दिशा आणि प्रेरणादायी कार्याचा ठसा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे डॉ. सोनावणे यांनी सांगितले. यासेरोद्दीन काझी यांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत माध्यम आणि प्रशासन यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होण्याची गरज अधोरेखित केली. शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि जनहिताच्या निर्णयांची अचूक व वेळेवर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS