सर्वोच्च न्यायालयात 9 न्यायमूर्तींचा शपथविधी

Homeताज्या बातम्यादेश

सर्वोच्च न्यायालयात 9 न्यायमूर्तींचा शपथविधी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज, मंगळवारी नऊ नवीन न्यायमूर्तींचा शपथविधी पार पडला. देशाचे सरन्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांनी या सर्व न्यायमूर्तीना

पुणतांब्याचा पाणीप्रश्‍न न्यायालयीन लढाईत अडकणार ?
आदीवासींना न्याय मिळवून दिला ः डामोर
मंदीचे सावट गडद

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज, मंगळवारी नऊ नवीन न्यायमूर्तींचा शपथविधी पार पडला. देशाचे सरन्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांनी या सर्व न्यायमूर्तीना शपथ दिली. देशाच्या इतिहासात 9 न्यायमूर्तींनी एकाच वेळी पदाची शपथ घेण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायमूर्ती नवीन न्यायमूर्तींना पदाची शपथ देतात. यापूर्वी देशात एकदम 9 न्यायमूर्तीचा कधीच शपथविधी झाला नव्हता. त्यामुळे आजचा हा सोहळ सर्वार्थाने ऐतिहासीक ठरला या 9 न्यायमूर्तींच्या सहभागाने आता सर्वोच्च न्यायलयात एकूण 34 न्यायमूर्ती झाले आहेत. सर्वोच्च न्यायलयाच्या विस्तारित इमारतीमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यात न्या. श्रीनिवास ओक (पूर्वी कर्नाटकचे मुख्य न्यायमूर्ती होते) न्या. विक्रम नाथ (पूर्वी गुजरातचे मुख्य न्यायमूर्ती होते) न्या. जितेंद्र कुमार माहेश्वरी (सिक्कीम) न्या. हिमा कोहली (तेलंगणा) न्या. बी.व्ही. नागरथना (कर्नाटक) न्या. सी.टी. रविकुमार (केरळ) न्या. एम.एन. सुंदरेश (मद्रास) न्या. बेला त्रिवेदी (गुजरात) आणि न्या. पी.एस. नरसिंह (माजी अतिरिक्त रॉलिसिटर जनरल) यांचा समावेश आहे. या सर्वांना सरन्यायाधीशांद्वारे पदाची शपथ देण्यात आली.

COMMENTS