Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पायाभूत विकासाला नवी दिशा देणारे अधिकारी; शरद राजभोज व संतोष शेलार यांची सचिवपदी नियुक्ती

महाराष्ट्राच्या प्रशासनात, विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागात, काही अधिकारी आपल्या कामातून केवळ पायाभूत सुविधा उभारत नाहीत, तर लोकांच्या विश्‍वासा

अक्षय घाणेची कर व्यवस्थापक पदावर निवड  
पाटसकर अशोक गायकवाड टोळीचा मुंबई सा.बां. वर दरोडा
‘ओम’ यांनी धर्मदाय आयुक्त पदाचे शिखर गाठावे-इंजी. अजिंक्य आनेराव

महाराष्ट्राच्या प्रशासनात, विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागात, काही अधिकारी आपल्या कामातून केवळ पायाभूत सुविधा उभारत नाहीत, तर लोकांच्या विश्‍वासाची भक्कम पायाभरणी करतात. अशा कार्यकर्तृत्ववान अधिकार्‍यांच्या यादीत शरद राजभोज आणि संतोष शेलार यांची नावे आज अग्रक्रमाने घेतली जात आहेत. या दोघांची नुकतीच सचिवपदी झालेली नियुक्ती ही केवळ पदोन्नती नसून त्यांच्या सातत्यपूर्ण लोकाभिमुख कार्याची पावती आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग हा राज्याच्या विकासाचा कणा मानला जातो. या विभागाने अनेक दूरदृष्टी असलेल्या अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक अधिकार्‍यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि लोकाभिमूख कामांनी या विभागाला नवी उंची मिळवून दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नावं घ्यायची झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री अनिलकुमार गायकवाड, पायाभूत सोयी-सुविधा समितीचे कार्यकारी संचालक रणजीत हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सविच आबासाहेब नागरगोजे, सचिव शरद राजभोज, सचिव संतोष शेलार, मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी या अधिकार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक नवी उंची मिळवून दिली आहे. त्यातच शरद राजभोज आणि संतोष शेलार यांची नुकतीच सचिवपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा धांडोळा.
शरद राजभोज यांचा कार्यप्रवास अत्यंत समृद्ध आणि बहुआयामी आहे. नाशिक, सातारा येथे कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना त्यांनी कामातील काटेकोरपणा आणि जनहिताची जाणीव जपली. रत्नागिरी येथे अधीक्षक अभियंता आणि पुढे कोकण विभागाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी पायाभूत सुविधा उभारणीसोबतच गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या कार्यशैलीत केवळ तांत्रिक कौशल्य नाही, तर समाजाभिमुख दृष्टिकोनही ठळकपणे दिसतो. राजभोज यांचे वैशिष्ट्य म्हणजे ‘काम हेच बोलते’ हा त्यांचा विश्‍वास. मितभाषी, परंतु कर्तव्यदक्ष असा त्यांचा स्वभाव प्रशासनात आदर्श मानला जातो. वरिष्ठांचे मार्गदर्शन स्वीकारून त्यातून स्वतःची कार्यपद्धती अधिक सक्षम करण्याची त्यांची वृत्ती त्यांना वेगळेपण देते. विशेषतः श्री अनिलकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घेतलेले धडे त्यांच्या कारकिर्दीत निर्णायक ठरले. म्हणूनच त्यांनी जिथे काम केले, तिथे त्यांच्या नावाचा उल्लेख आदराने केला जातो.
दुसरीकडे, संतोष शेलार यांची कारकीर्दही तितकीच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप सुरुवातीलाच उमटवली. कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद अशा विविध ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना त्यांनी विकासकामांना वेग देतानाच पारदर्शकतेचा आग्रह धरला. राष्ट्रीय महामार्ग विभागात सचिव म्हणून नियुक्त झाल्यानंतर शेलार यांच्याकडून अधिक व्यापक दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेत वेग, अचूकता आणि लोकहिताचा स्पष्ट विचार दिसून येतो. त्यामुळेच ते केवळ प्रशासक न राहता जनतेच्या अपेक्षांचे प्रतिनिधी म्हणूनही ओळखले जातात. या दोन्ही अधिकार्‍यांमध्ये समान धागा म्हणजे लोकाभिमुखता. केवळ प्रकल्प पूर्ण करणे हा उद्देश न ठेवता, त्या प्रकल्पांचा थेट फायदा जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कामात ‘मानवी स्पर्श’ जाणवतो.
आगामी काळात या दोघांकडे मोठ्या जबाबदार्‍या येण्याची शक्यता आहे. कारण शरद राजभोज यांची आणखी पाच वर्षे सेवा शिल्लक आहे. त्यामुळे येणार्या काळात ते सार्वजनिक बांधाकाम विभागाचे सचिव म्हणून देखील नियुक्त होऊ शकतात. त्याचप्रमाणे संतोष शेलार हे देखील सार्वजनिक बांधकाम विभागात प्रधान सचिव होऊ शकतात. कारण त्यांची 7 वर्षे सेवा शिल्लक असल्यामुळे भविष्यात त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती होऊ शकते. दोन्ही अधिकार्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीठ असा ठसा उमटवलेला असून, शरद राजभोज यांचा अनुभव आणि संतोष शेलार यांची कार्यगती यांचा संगम सार्वजनिक बांधकाम विभागासाठी नवी दिशा ठरू शकतो. प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता या तिन्ही बाबींमध्ये ते नवे मापदंड प्रस्थापित करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अशा कार्यकर्तृत्ववान अधिकार्‍यांच्या हातून राज्याच्या विकासाला नवी चालना मिळावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाव अधिक उजळावे आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडावा-हीच अपेक्षा. या दोन्ही अधिकार्‍यांना त्यांच्या नव्या जबाबदार्‍यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

COMMENTS