राहाता : नाशिक,मिरगाव, राहाता तसेच विविध ठिकाणी अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडी यांच्याकडून भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत सोमवारी अंमलबजावणी संचनालय यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक (ईडी) दाखल झाले. शाखेतील आर्थिक व्यवहारांची दिवसभर सखोल चौकशी सुरू होती. ईडीचे पथक आल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती.मिळालेल्या माहितीनुसार समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी तब्बल १०० खाती असल्याचे समोर आले आहे. या खात्यांवरून सुमारे ६० कोटींवरून अधिक आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ईडीने आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्री आणि संबंधित बाबींचा तपास हाती घेतला आहे.एकीकडे शिर्डी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना आता ईडीने देखील स्वतंत्ररित्या तपास सुरू केल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. नाशिक, मिरगाव व राहाता अशा विविध ११ ठिकाणी एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात येत असून संबंधित ठिकाणांवरील कागदपत्रे,व्यवहार नोंदी आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत ईडीचे पाच ते सहा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.त्यांनी शाखेतील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली असून संशयित व्यवहारांची माहिती, खातेदारांचे तपशील आणि निधीच्या स्त्रोता बाबत सखोल माहिती घेतली जात आहे. अशोक खरात यांच्या मालमत्ता, त्याच्या नावावर किंवा संबंधितांच्या नावावर असलेले व्यवहार तसेच पतसंस्थांमध्ये आर्थिक उलाढाली यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे.पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात ही खाती कशी उघडली गेली? त्या खात्यांवर व्यवहार करणारे कोण होते? एवढे मोठे व्यवहार या खात्यांवर कशाप्रकारे झाले? हा सर्व तपास ईडीपथकाकडून करण्यात येत असल्याचे समजते. या कारवाईमुळे येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS