Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापुरुषांची वाटणी नको; समाज एकत्र ठेवा

मिरजगाव : महापुरुषांनी कोणत्याही एका जातीसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी कार्य केले आहे. मात्र आज त्यांच्या नावावरून समाजात फूट पाडण्याचे प्

कडा येथील ग्रामपंचायत सदस्य बिपिन शेठ भंडारी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला
कोंभळी महसूल मंडळात महाराजस्व अभियान उत्साहात 
राहात्यात समता पतसंस्थेवर ईडीची धाडदिवसभर चौकशी; अशोक खरात प्रकरणी कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास

मिरजगाव : महापुरुषांनी कोणत्याही एका जातीसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी कार्य केले आहे. मात्र आज त्यांच्या नावावरून समाजात फूट पाडण्याचे प्रकार वाढत असून, आपण सर्वांनी महापुरुषांची वाटणी न करता त्यांचे विचार आत्मसात करून समाज एकत्र ठेवण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी केले.

 महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे दादासाहेब सोनमाळी, अध्यक्षस्थानी डॉ. विलास कवळे, तसेच पत्रकार तानाजी डाडर आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्रमुख पाहुणे दादासाहेब सोनमाळी यांनी सत्काराच्या पद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त केली. “शाल-श्रीफळाऐवजी महापुरुषांची पुस्तके देऊन त्यांच्या विचारांचा प्रसार करावा,” असे ते म्हणाले. महापुरुषांचे विचार आजच्या काळात अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 पत्रकार तानाजी डाडर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, “महापुरुषांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे,” असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. विलास कवळे यांनी श्रेयवादाच्या प्रवृत्तीवर टीका करत, महापुरुषांनी मोठे कार्य करूनही कधीही त्याचे श्रेय घेतले नाही, असे नमूद केले. विद्यार्थ्यांनीही यावेळी प्रभावी भाषणे सादर केली.

 कार्यक्रमास भाजपचे अनिल गदादे, धनंजय बरकडे, लहू मथे, ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे, अमित कोल्हे, राजेंद्र शेळके, ताराचंद पांडुळे, दादासाहेब शेळके, लालासाहेब कवळे, रोहिदास शिंगटे, सर्जेराव डाडर, अंबर कोठावळे, नवनाथ ठोकळ, बबन क्षीरसागर, कैलास डाडर, डॉ. योगेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

 जयंतीचे आयोजन महात्मा ज्योतिराव फुले प्रतिष्ठान, नागलवाडीच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा. सुनील टकले यांनी केले, तर आभार धनंजय मथे यांनी मानले.

COMMENTS