Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताची 5 सुवर्णांसह 16 पदकांची कमाई

नवी दिल्ली : आशियाई बॉक्सिंग स्पर्धा 2026 मध्ये भारतीय संघाने उल्लेखनीय यश संपादन करत पाच सुवर्णपदकांसह एकूण 16 पदकांची कमाई केली. या कामगिरीमुळे

उमरी/सावंतवाडी प्रीमियर लीगवर ‘यजमान’ उमरी संघाचे वर्चस्व; दहीटना उपविजेता! विष्णुभाऊ घुले यांच्या हस्ते 51,111 चे प्रथम पारितोषिक प्रदान
IPL मध्ये ‘काळी जादू’? चाहत्याने फिरवलं लिंबू अन् CSK चा फलंदाज बाद सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ
बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा यू-16 संघ बिडकीनकडे रवाना; एडीएफसी क्रिकेट क्लब व युनिक स्पोर्ट्सकडून खेळाडूंना किटचे वाटप
Vishvanath strikes gold as India finish 2nd at Asian Boxing Championships -  The Statesman


नवी दिल्ली : आशियाई बॉक्सिंग स्पर्धा 2026 मध्ये भारतीय संघाने उल्लेखनीय यश संपादन करत पाच सुवर्णपदकांसह एकूण 16 पदकांची कमाई केली. या कामगिरीमुळे भारताने एकूण पदकसंख्येत अव्वल स्थान पटकावले, तर सुवर्णपदकांच्या संख्येनुसार दुसरे स्थान मिळवले. सहा सुवर्णपदकांसह कझाकस्तानने पहिले स्थान मिळवले.
पुरुष गटात विश्‍वनाथ सुरेश याने 50 किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्याने जपानच्या दाइची इवाईचा एकतर्फी 5-0 अशा फरकाने पराभव केला. दुसरीकडे, 60 किलो गटात सचिनने अंतिम फेरीत दमदार लढत दिली, मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला गटात भारतीय संघाची कामगिरी विशेष ठरली. संघाने चार सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण 10 पदके जिंकत पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले. खंडीय स्तरावर महिला संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. महिला गटातील मीनाक्षी (48 किलो), प्रीती (54 किलो), प्रिया (60 किलो) आणि अरुंधती (70 किलो) यांनी आपल्या गटात वर्चस्व गाजवत सुवर्णपदके मिळवली. जस्मिन (57 किलो) आणि अल्फिया पठाण (80 किलोपेक्षा अधिक गट) यांनी रौप्यपदके जिंकून संघाच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला. विश्‍वनाथ सुरेश याचे सुवर्णपदक विशेष लक्षवेधी ठरले. राष्ट्रीय स्तरावर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप उमटवली आहे. अंतिम फेरीपूर्वी अव्वल क्रमांकाच्या खेळाडूवर मिळवलेला त्याचा विजय त्याच्या आत्मविश्‍वासाचे आणि जिद्दीचे प्रतीक मानला जात आहे. भारतीय मुष्टियुद्ध महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, ही स्पर्धा भारतीय मुष्टियुद्धासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. महिला संघाने अव्वल स्थान मिळवून देशाचा गौरव वाढवला असून पुरुष संघानेही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः तरुण खेळाडूंनी दिलेला लढा भविष्यासाठी आशादायी आहे. ते पुढे म्हणाले की, संघात मोठे बदल होऊनही खेळाडूंनी धैर्य आणि गुणवत्ता दाखवली.

COMMENTS