बेल्हे-शिरूर रस्ता अरुंद; निघोज-जवळा परिसरात संताप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेल्हे-शिरूर रस्ता अरुंद; निघोज-जवळा परिसरात संताप

निघोज : बेल्हे-शिरूर मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असले तरी निघोज व जवळा येथील एसटी बसस्थानक परिसरात रस्त्याची रुंदी अत्यंत कमी ठेवण्यात आल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात २० मीटर रुंदी आवश्यक असताना केवळ १० मीटर रुंदी ठेवण्यात आल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असलेल्या या रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी सुरू झाले. कामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना जमीन नुकसानभरपाई मिळावी यासाठी आंदोलनही झाले होते. त्यानंतर आमदार काशिनाथ दाते यांच्या सूचनेनुसार कामास गती देण्यात आली. सध्या काम वेगाने सुरू असले तरी आवश्यक त्या ठिकाणी अपेक्षित रुंदी न घेतल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. निघोज व जवळा या दोन्ही गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून निघोजमध्ये सुमारे २५ हजार, तर जवळा येथे १० ते १२ हजार लोकवस्ती आहे. कुकडी कालव्यामुळे या भागात आर्थिक प्रगती झाली असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बेल्हे–शिरूर मार्गावर रात्रंदिवस हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. याच पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात रस्ता अरुंद ठेवल्यास वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. निघोज येथील यात्रा १० एप्रिलपासून सुरू होणार असल्याने ९ एप्रिलपर्यंत रस्त्यावर डांबरीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात काम पूर्ण करण्याऐवजी रस्त्याचे नियोजनबद्ध रुंदीकरण करून किमान २० मीटर रुंदी ठेवावी, अशी मागणी जोर धरत आहे. मुलिका देवी महाविद्यालय ते पठारवाडी परिसरातील घोडोबा फाटा तसेच जवळा पर्यंतचा संपूर्ण मार्ग रुंद करून दोन्ही बाजूंनी गटारीचे काम करावे, अशीही मागणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर निघोज येथील मुलिका देवी महाविद्यालय व विद्यालयात सध्या तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना याच मार्गावरून ये-जा करावी लागते. सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात दुचाकी व सायकलची गर्दी होत असल्याने अरुंद रस्त्यावर अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणे बदलतायत;भाजप-काँग्रेस-शिवसेना ‘ऑन मोड’, राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस
सहकारभारतीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी हजारे
‘आकाशवाणी @ 90’ निमित्त निबंध स्पर्धा उत्साहात; अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवर विचारमंथन

निघोज : बेल्हे-शिरूर मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असले तरी निघोज व जवळा येथील एसटी बसस्थानक परिसरात रस्त्याची रुंदी अत्यंत कमी ठेवण्यात आल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात २० मीटर रुंदी आवश्यक असताना केवळ १० मीटर रुंदी ठेवण्यात आल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असलेल्या या रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी सुरू झाले. कामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना जमीन नुकसानभरपाई मिळावी यासाठी आंदोलनही झाले होते. त्यानंतर आमदार काशिनाथ दाते यांच्या सूचनेनुसार कामास गती देण्यात आली. सध्या काम वेगाने सुरू असले तरी आवश्यक त्या ठिकाणी अपेक्षित रुंदी न घेतल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.

निघोज व जवळा या दोन्ही गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून निघोजमध्ये सुमारे २५ हजार, तर जवळा येथे १० ते १२ हजार लोकवस्ती आहे. कुकडी कालव्यामुळे या भागात आर्थिक प्रगती झाली असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बेल्हे–शिरूर मार्गावर रात्रंदिवस हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. याच पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात रस्ता अरुंद ठेवल्यास वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

निघोज येथील यात्रा १० एप्रिलपासून सुरू होणार असल्याने ९ एप्रिलपर्यंत रस्त्यावर डांबरीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात काम पूर्ण करण्याऐवजी रस्त्याचे नियोजनबद्ध रुंदीकरण करून किमान २० मीटर रुंदी ठेवावी, अशी मागणी जोर धरत आहे. मुलिका देवी महाविद्यालय ते पठारवाडी परिसरातील घोडोबा फाटा तसेच जवळा पर्यंतचा संपूर्ण मार्ग रुंद करून दोन्ही बाजूंनी गटारीचे काम करावे, अशीही मागणी करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

निघोज येथील मुलिका देवी महाविद्यालय व विद्यालयात सध्या तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना याच मार्गावरून ये-जा करावी लागते. सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात दुचाकी व सायकलची गर्दी होत असल्याने अरुंद रस्त्यावर अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

COMMENTS