Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साधुग्रामासाठी वृक्षतोड कुठल्या संस्कृतीत बसते : अ‍ॅड.असीम सरोदे

मुंबई : नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान साधुग्राम उभारण्यासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून अ‍ॅड.असीम सरो

नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचे ‘हे’ आहे कारण… होतोय मोठा परिणाम
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन
वीज, रोजगार आणि पर्यावरण : नांदेडच्या विकासाचा त्रिसूत्री अजेंडा-ना.पंकजाताई मुंडे

मुंबई : नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान साधुग्राम उभारण्यासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून अ‍ॅड.असीम सरोदे यांनी राज्य सरकारवर थेट टीका करत खुले पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, निसर्गाशी सुसंवाद साधत जीवन जगणे हीच भारतीय आणि सनातन संस्कृतीची खरी ओळख आहे. अशा परिस्थितीत साधुग्राम उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करणे ही कोणत्या संस्कृतीची जपणूक आहे, असा थेट प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. सरोदे यांनी सरकारला उपरोधिक टोला लगावत देशावर प्रेम करून पाहा असा सल्लाही दिला आहे. विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देणे थांबवून पर्यायी उपाय शोधावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS