श्रीरामपुरात हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपुरात हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

अहमदनगर/प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी परिसरातील पाच हातभट्टी दारूअड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीराम

मोहिनीनगरला घरफोडीत 16 हजाराचा ऐवज चोरीस
वैष्णवदेवी बालमित्रांनी साकारली किल्ल्याची प्रतिकृती
संगमनेरमध्ये मनोरुग्ण महिलेवर अत्याचार

अहमदनगर/प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी परिसरातील पाच हातभट्टी दारूअड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. श्रीरामपूर शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करणारे अड्डे व हातभट्टी दारू विक्री करणार्‍या सर्वच ठिकाणी छापेमारी करून अड्डे उध्वस्त केले गेले आहेत. या कारवाईत येथील अशोक काशिनाथ शिंदे याची हातभट्टी उदध्वस्त केली, यात 42 हजार रुपये किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 2 हजार 500 रुपये किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट केली. येथील अशोक सीताराम गायकवाड याचीही हातभट्टी उदध्वस्त केली. यात 45 हजार 500 रुपये किमतीचे 650 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 3 हजार रुपये किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट केली. राजेंद्र फुलारे याची हातभट्टी उदध्वस्त करताना 42 हजार रुपये किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 3 हजार रुपये किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट केली गेली. दिलीप नाना फुलारे याच्या हातभट्टीवर छापा मारून 28 हजार रुपये किमतीचे 400 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 2 हजार रुपये किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट केली. सुरेश फुलारे याच्या हातभट्टीवरील 42 हजार रुपये किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व तीन हजार 500 रुपये किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट केली गेली. अशा पाच ठिकाणावरील गावठी हातभट्टी अड्डे पहाटे अचानक केलेल्या कारवाईत श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी मिटके यांच्या पथकाने उदध्वस्त केले आहे. ही कारवाई पोलिस उप निरीक्षक ऊजे, सहायक फौजदार राजेंद्र आरोळे, पोलिस हवालदार सुरेश औटी, पोलिस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, श्याम बनकर, आदिनाथ चेमटे, प्रदीप गर्जे, सलमान कादरी, गौतम दिवेकर आरसीपी पथक श्रीरामपूर आदींच्या पथकाने केली.

गुन्हा केला दाखल
श्रीरामपूर परिसरातील गोंधवणीमध्ये गावठी हातभट्ट्यांवर कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत एकूण 2 लाख 13 हजार 500 रुपये किमतीचा गुन्ह्याचा माल आरोपींच्या ताब्यातून जप्त केला असून ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

COMMENTS