कमी आणि मध्यम उत्पन्नाच्या देशांत बाल कर्करोगाचा धोका!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कमी आणि मध्यम उत्पन्नाच्या देशांत बाल कर्करोगाचा धोका!

 ‌ एका जागतिक पाहणीचा अहवाल "द लॅन्सेट" या नियतकालिकात प्रकाशित झाला असून त्यानुसार जगातील बाल कर्करोगामुळे होणाऱ्या ९४ टक्के मृत्यू कमी आणि

उच्चभ्रू शेतकरी जातींच्या मग्रुरीला नरेंद्र मोदी यांनी ठेचून काढले! 
महाराष्ट्र भूषण राम सुतार !
देशात पहिल्या फेरीत भरघोस मतदान ! 
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1-1-1.png

 ‌ एका जागतिक पाहणीचा अहवाल “द लॅन्सेट” या नियतकालिकात प्रकाशित झाला असून त्यानुसार जगातील बाल कर्करोगामुळे होणाऱ्या ९४ टक्के मृत्यू कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळतात. उपचारांचा खर्च न परवडणारा आणि कोणत्याही प्रकारच्या सकस आहाराची सोय नसल्याने या गटात हे मृत्यू घडताहेत. आरोग्यसेवा आणि उपचारांच्या उपलब्धतेमधील सातत्यपूर्ण अभाव हे यामागील प्रमुख कारण आहे. 

२०२३ मध्ये भारतात १७,०००, चीनमध्ये १६,००० आणि नायजेरिया व पाकिस्तानमध्ये प्रत्येकी सुमारे नऊ हजार बाल कर्करोग मृत्यू झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस, इंज्युरीज, अँड रिस्क फॅक्टर्स स्टडी’ च्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, २०२३ मध्ये जगभरात बाल कर्करोगाची ३,७७,००० नवीन प्रकरणे समोर आले. त्यामुळे सुमारे १,४४,००० मृत्यू होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

‘ग्लोबल बर्डन डिसीज २०२३ चाइल्डहुड कॅन्सर कोलॅबोरेटर्स’ या संस्थेची स्थापना करणाऱ्या संशोधकांनी सांगितले की, जगभरात बाल कर्करोगामुळे होणारे मृत्यू १९९० मधील १.९७ लाखांच्या तुलनेत २७ टक्क्यांनी कमी झाले आहेत, परंतु आफ्रिकेत त्यात ५५.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, बालपणीचा कर्करोग हे बालमृत्यूंचे आठवे प्रमुख कारण आहे. तो मर्यादित संसाधने असलेल्या ठिकाणी बाल कर्करोगाची वाढ ही धक्कादायक तर आहेच पण, तितकीच विषम प्रमाणात आहे. भारतासह, निम्न-मध्यम सामाजिक-लोकसंख्याशास्त्रीय निर्देशांक असलेल्या राष्ट्रांमध्ये, २०२३ मध्ये सर्व वयोगटांतील जागतिक कर्करोग मृत्यूंमध्ये बालपणीचा कर्करोग हा अकरावा सर्वात मोठा कारणीभूत घटक असल्याचे आढळले.

२०२३ मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार जगातील मुलांना अपंग बनविण्यात आणि आयुर्मान कमी करण्यामध्ये देखील हा दहावा सर्वात मोठा घटक आहे. 

“बालपणीच्या कर्करोगाचा बहुतांश धोका मर्यादित संसाधने असलेल्या ठिकाणी आढळला, ज्यात ८५.१ टक्के नवीन प्रकरणे, ९४.१ टक्के मृत्यू घडतात. हे निम्न-मध्यम-उत्पन्न आणि उच्च-मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जागतिक बँकेच्या वर्गीकरणानुसार कमी-उत्पन्न, निम्न-मध्यम-उत्पन्न आणि उच्च-मध्यम-उत्पन्न देशांचा यात प्रामुख्याने समावेश होत असल्याचे जागतिक संस्थेने म्हटले आहे.”

“बाल कर्करोगाचा जागतिक पातळीवर फैलाव होत असून जगाच्या बाल आरोग्यावर हे मोठे संकट आहे.संसाधनांची कमतरता असलेल्या प्रदेशांमध्ये याची वाढ मोठ्या प्रमाणात आहे,” असल्याचे ही हा अहवाल म्हणतो. 

जगातील बाल कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ल्युकेमियामुळे ४५,९०० होणाऱ्या मृत्यूंचा वाटा सर्वाधिक असल्याचे आढळून आले, त्यानंतर मेंदू आणि मज्जासंस्थेचा कर्करोग २३,२००, आणि नॉन-हॉजकिन लिम्फोमा १५,२००, लिम्फ प्रणालीचा कर्करोग यांचा क्रमांक लागतो.

“उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अनेक बाल कर्करोगांच्या उपचारांचे परिणाम सुधारले असले तरी, या लाभांचे समान वाटप झालेले नाही,” असे अमेरिकेतील वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या प्रमुख लेखिका लिसा फोर्स यांनी म्हटले आहे.

“कर्करोगग्रस्त मुलांपैकी बहुसंख्य मुले कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात, जिथे निदानास होणारा विलंब, आवश्यक कर्करोग उपचारांचा अभाव आणि आरोग्य प्रणालीतील इतर मर्यादा व काळजी घेण्यातील अडथळे बाल कर्करोगाच्या वाढीचा विषम धोका निर्माण करू शकतात,” असे फोर्स म्हणाल्या. 

संशोधकांनी या अभ्यासात यावर भर दिला आहे की, उपचारांचे परिणाम सुधारण्यासाठी कर्करोग नियंत्रण प्रणालींमध्ये, विशेषतः कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, वाढीव गुंतवणुकीची आवश्यकता असेल. यामध्ये वेळेवर निदानास सहाय्य करणाऱ्या संदर्भ प्रणाली, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिओथेरपीची उपलब्धता, तसेच अधिक मजबूत कर्करोग नोंदणी आणि देखरेख प्रणाली यांचा समावेश आहे.

COMMENTS