घोडेगावात तलावात बुडून तिघांचा मृत्यू; दोन मृतदेह सापडले तिसराचा शोध सुरु

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घोडेगावात तलावात बुडून तिघांचा मृत्यू; दोन मृतदेह सापडले तिसराचा शोध सुरु

सोनई : -नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी तिघ

घोडेगावात वाहतुकीचा उडाला बोजवारा; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त. वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
घोडेश्वरी देवी यात्रोत्सवास उद्यापासून प्रारंभ  
शेवगावात अवैध देशी दारू विक्री विरोधात उपोषणाचा इशारा

सोनई : -नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी तिघे जण पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवार (दि.३१ मार्च) रोजी दुपारी सुमारे ४वाजण्याच्या सुमारास घडली.प्रथमेश काळे व जीवन आव्हाड हे दोन मृतदेह सापडले असून तिसरा शोएब शेख याची शोध मोहीम एनडीआरफ पथकाकडून सुरु होती.

प्रथमेश सुभाष काळे (वय १७), शोएब आयुब शेख (वय १७), जीवन रवींद्र आव्हाड (वय १६) व रेहान अन्वर शेख (वय १० सर्व रा. घोडेगाव) हे चौघे मित्र तलावात पोहण्यासाठी गेले होते.त्यापैकी प्रथमेश, शोएब व जीवन हे तिघे मित्र पाण्यात बुडाले. या घटनेत प्रथमेश सुभाष काळे, जीवन रवींद्र आव्हाड या दोघांचा मृतदेह शोध पथकाला मिळाला आहे. तर रेहान अन्वर शेख हा वरती थांबल्याने  सुरक्षित असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी लगेचच धाव घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली आहे. स्थानिक पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने शोधमोहीम सुरू असून नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

COMMENTS