Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुपा औद्योगिक वसाहतीलगत व्यंकटेश कंपनीला भीषण आग;आठ तासांहून अधिक काळ धग; कोट्यवधींचे नुकसान, कारण अस्पष्ट

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीलगत पळवे शिवारात असलेल्या व्यंकटेश कंपनीला सोमवारी (दि. ३०) पहाटे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. सकाळी सुमारे सहाच्या सुमारास लागलेली आग तब्बल आठ तासांहून अधिक काळ धगधगत होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नगर–पुणे महामार्गालगत असलेली ही कंपनी गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून पीजी व एलजीसारख्या कंपन्यांना माल पुरवित होती. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी आग अतिशय मोठ्या प्रमाणावर पसरली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कंपनी परिसरात मालवाहतूक वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना आतपर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे आग विझविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत गेले आणि काही वेळातच संपूर्ण कंपनीने पेट घेतला. विशेष म्हणजे, याच कालावधीत मागील वर्षीही या कंपनीला आग लागली होती. त्यावेळीही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे ही आग संशयास्पद असून यामागे काही षडयंत्र आहे का, अशी चर्चा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पारनेरचे तहसीलदार तसेच परिसरातील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, आगीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. या घटनेमुळे सुपा औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमध्येही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन आणि अग्निशमन दल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या आगीमागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला असून शॉर्ट सर्किट, रासायनिक प्रतिक्रिया किंवा इतर तांत्रिक कारणांचा अंदाज वर्तवला जात आहे. एकंदरीत, ही घटना औद्योगिक सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान
कुकडीच्या लिंक कॅनॉलवरील पाणी वाटपावरून वाद; अन्यायकारक वितरणाविरोधात पाणी वापर संस्थांचा एल्गार; आंदोलनाचा इशारा
रांजणगाव रोड येथे हनुमान जयंती उत्साहात

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीलगत पळवे शिवारात असलेल्या व्यंकटेश कंपनीला सोमवारी (दि. ३०) पहाटे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. सकाळी सुमारे सहाच्या सुमारास लागलेली आग तब्बल आठ तासांहून अधिक काळ धगधगत होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नगर–पुणे महामार्गालगत असलेली ही कंपनी गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून पीजी व एलजीसारख्या कंपन्यांना माल पुरवित होती. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी आग अतिशय मोठ्या प्रमाणावर पसरली होती.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कंपनी परिसरात मालवाहतूक वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना आतपर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे आग विझविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत गेले आणि काही वेळातच संपूर्ण कंपनीने पेट घेतला.

विशेष म्हणजे, याच कालावधीत मागील वर्षीही या कंपनीला आग लागली होती. त्यावेळीही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे ही आग संशयास्पद असून यामागे काही षडयंत्र आहे का, अशी चर्चा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पारनेरचे तहसीलदार तसेच परिसरातील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, आगीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.

या घटनेमुळे सुपा औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमध्येही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन आणि अग्निशमन दल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या आगीमागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला असून शॉर्ट सर्किट, रासायनिक प्रतिक्रिया किंवा इतर तांत्रिक कारणांचा अंदाज वर्तवला जात आहे. एकंदरीत, ही घटना औद्योगिक सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

COMMENTS