Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुपा एमआयडीसीत फायर ऑडिटमध्ये कुचराई : अविनाश पवार; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुपा : सुपा एमआयडीसी परिसरातील उद्योगांमध्ये फायर ऑडिटमध्ये होत असलेल्या कुचराईमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांनी केली आहे. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, सुपा एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग सुरू होत असून त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, उद्योगधंद्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनेक कंपन्यांमध्ये फायर यंत्रणा केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात ती कार्यान्वित नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. गेल्या काही वर्षांत एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे. फायर सेफ्टीचे नियम पाळले जात नसतानाही संबंधित कंपन्यांना परवाने देण्यात येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आर्थिक गैरव्यवहारातून नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत, अशा प्रकारे कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सुपा एमआयडीसीतील सर्व कंपन्यांचे तातडीने फायर ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच सुरक्षाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्या व निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या; अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रांजणगाव रोड येथे हनुमान जयंती उत्साहात
सुपा औद्योगिक वसाहतीलगत व्यंकटेश कंपनीला भीषण आग;आठ तासांहून अधिक काळ धग; कोट्यवधींचे नुकसान, कारण अस्पष्ट

सुपा : सुपा एमआयडीसी परिसरातील उद्योगांमध्ये फायर ऑडिटमध्ये होत असलेल्या कुचराईमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांनी केली आहे.

पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, सुपा एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग सुरू होत असून त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, उद्योगधंद्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनेक कंपन्यांमध्ये फायर यंत्रणा केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात ती कार्यान्वित नसल्याचे वारंवार उघड झाले आहे.

गेल्या काही वर्षांत एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.

फायर सेफ्टीचे नियम पाळले जात नसतानाही संबंधित कंपन्यांना परवाने देण्यात येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आर्थिक गैरव्यवहारातून नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत, अशा प्रकारे कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुपा एमआयडीसीतील सर्व कंपन्यांचे तातडीने फायर ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच सुरक्षाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्या व निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

COMMENTS