Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग : मुख्यमंत्री फडणवीस; राज्यात 55 लाख नागरिकांना औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्

बेकायदा बांधकामे आता होणार वैध; चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा
अकोल्याचा पारा ४७ अंशांच्या उंबरठ्यावर; विदर्भात उष्णतेचा हाहाकार, नागपूर-लातूरमध्ये दोघांचा बळी
महाराष्ट्र ‘हॉटस्पॉट’! अकोल्याचा पारा ४७ अंशांच्या उंबरठ्यावर; विदर्भात उष्णतेचा हाहाकार, नागपूर-लातूरमध्ये उष्माघाताने दोघांचा बळी

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने 2027 पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली. देशात 2017 मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेच, देशातून हत्तीरोग निर्मूलन करण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीतही मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील 12 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहीम राबवली जात असून, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात, ज्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. राज्यामध्ये विशेष म्हणजे, काही निवडक जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) वापरली जात आहे. ही उपचारपद्धती अधिक प्रभावी मानली जाते आणि कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत करते. महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हत्तीरोगाचा मोठा प्रादुर्भाव असून, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे 55 लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

75 टक्के रूग्ण केवळ नागपूर विभागात
महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, लातूर, धाराशिव, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, नांदेड, ठाणे, पालघर, नंदुरबार, सोलापूर आणि यवतमाळ या 18 जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारी 2026 च्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 75 टवके रुग्ण एकट्या नागपूर विभागात आहेत. सर्वाधिक प्रभावित पाच जिल्हे: भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया.

COMMENTS