Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदा बांधकामे आता होणार वैध; चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

https://youtu.be/NHvVsMmoRAk?si=YQTiehD9UGrxhxtS नागपूर : महाराष्ट्रातील लाखो घरमालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील ना

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांची टीकेची झोड
नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार : बावनकुळे
महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री फडणवीस असतील- बावनकुळे

नागपूर : महाराष्ट्रातील लाखो घरमालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील नागरी भागातील बेकायदा बांधकामे (Unauthorised Constructions) आता नियमित करण्यात येणार असून, सरकार नागरिकांना त्यांच्या ‘हक्काच्या घराची पावती’ देणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अशा घरांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शहरांमध्ये अनेक नागरिक बेकायदा घरांमध्ये किंवा गुंठेवारी जागेवर बांधलेल्या घरांमध्ये राहत आहेत. या नागरिकांना सतत कारवाईची भीती असते. त्यांच्या या समस्येचा विचार करून, राज्य सरकारने सर्व बेकायदा बांधकामे वैध करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आता या घरांना regularize करून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराची पावती देईल, जेणेकरून ते आपल्या हक्काच्या घरात निर्धास्तपणे राहू शकतील.”

COMMENTS