Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हा बामुक्टा संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. विलास भिलारे यांची बिनविरोध निवड

चौसाळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ टीचर्स असोसिएशन (बामुक्टा) संघटनेच्या बीड जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बीड येथील बलभीम म

पोलिसांच्या मदतीने तीन अल्पवयीन मुलींची घर वापसी
श्रीक्षेत्र नेकनूर येथे रामजन्मोत्सव सोहळ्याची थाटात सांगता; काल्याच्या कीर्तनाला हजारोंची उपस्थितीरामायणातील आदर्श तत्वे आजच्या समाज व्यवस्थेसाठी मार्गदर्शक – महंत लक्ष्मण महाराज मेंगडे; प्रेमळ अंतःकरणाचा दयाळू साधू असे सुदामदेव महाराज – मेंगडे महाराज
भव्य रथातून प्रियदर्शी सम्राट अशोक महान जयंती मिरवणूक; बीडमध्ये उत्साहाचा जल्लोष; बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल व बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती; सामाजिक ऐक्याचा संदेश

चौसाळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ टीचर्स असोसिएशन (बामुक्टा) संघटनेच्या बीड जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बीड येथील बलभीम महाविद्यालयात दि. 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडली. विभागीय पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया शांततेत व सर्वानुमते पूर्ण झाली.
या निवडीत चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास भिलारे यांची बीड जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. बाबासाहेब कोकाटे व विभागीय उपाध्यक्ष डॉ. रमेश लक्ष्मणराव वारे यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्येष्ठ नेते डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. अध्यक्ष – प्राचार्य डॉ. अर्जुन मोरे (वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर), उपाध्यक्ष – डॉ. विलास भिलारे (चौसाळा), डॉ. राजकुमार थोरवे (आष्टी), डॉ. ज्ञानेश्वर शिंदे (माजलगाव), कोषाध्यक्ष – डॉ. संजय सुरवसे (बीड), सचिव – डॉ. शंकरराव वाघमारे (नेकनूर), सहसचिव – सुनील जाधव, डॉ. हरिभाऊ कदम (शिरसाळा), डॉ. सतीश कदम, महिला प्रतिनिधी – डॉ. सुचिता खामकर, याशिवाय डॉ. रफिक शेख, डॉ. राजकुमार चाटे, डॉ. सखाराम पांढरे, डॉ. रमेश माने, डॉ. गजानन दराडे, डॉ. ज्ञानेश्वर येवले, डॉ. इंगोले, डॉ. अशोक होके, डॉ. सचिन खिस्ते, डॉ. पठाण (गेवराई) आदी मान्यवरांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे., नवीन पदाधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी गेवराई, माजलगाव, परळी, केज, धारूर, बीड, पाटोदा, शिरूर आदी तालुक्यांतील प्राध्यापक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS