Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इराणने उडवली संघर्षविरामची खिल्ली; अमेरिका स्वतःशी चर्चा करत असल्याचे म्हणत डिवचले

तेहरान : पश्‍चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणकडून अमेरिकेच्या संघर्षविराम प्रयत्नांवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. इराणी सैन्या

दूरच्या युद्धाचे स्वयंपाकघरावर सावट !
तेहरान हल्ल्यानंतर मोजतबा खामेनेई कोमामध्ये
कोपर्डीतील शेतकऱ्यांवर चुकीच्या पंचनाम्यामुळे अन्याय; नागरिकांचा आरोप ; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी

तेहरान : पश्‍चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणकडून अमेरिकेच्या संघर्षविराम प्रयत्नांवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. इराणी सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर उपरोधिक टीका करत, त्यांच्या प्रस्तावांना कोणतेही गांभीर्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इराणी सैन्याच्या ‘खातम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालया’चे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम जोल्फगारी यांनी बुधवारी प्रसारित झालेल्या एका ध्वनिचित्रफितीतून आपली भूमिका मांडली. या संदेशात त्यांनी अमेरिकेच्या धोरणांवर निशाणा साधत म्हटले की, स्वतःला महासत्ता म्हणवणार्‍या देशाने या संकटावर ठोस तोडगा काढण्यात अपयश पत्करले आहे. जोल्फगारी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिकेने पूर्वी ज्या रणनीतिक ताकदीचा उल्लेख केला होता, ती आता पूर्णपणे अपयशात परिवर्तित झाली आहे. त्यांच्या मते, जर अमेरिका खरोखरच प्रभावी आणि सक्षम असती, तर आतापर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असते. त्यांनी अमेरिकेला उद्देशून असेही म्हटले की, पराभवाला कराराचे रूप देण्याचा प्रयत्न करू नये आणि पोकळ आश्‍वासनांच्या आधारे परिस्थिती बदलणार नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेतील अंतर्गत मतभेदांवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. तुमच्यातील मतभेद इतके वाढले आहेत का की तुम्ही आता स्वतःशीच चर्चा करत आहात? असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, अमेरिकेकडून पाकिस्तानमार्गे इराणकडे पंधरा मुद्द्यांचा संघर्षविराम प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर लगेचच हे वक्तव्य करण्यात आले. त्यामुळे या प्रस्तावाबाबत इराणची भूमिका किती कठोर आहे, हे स्पष्ट झाले आहे. जोल्फगारी यांनी शेवटी ठाम शब्दांत सांगितले की, इराणची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आणि ठाम आहे. आमचे मत पहिले जे होते, तेच शेवटपर्यंत राहील. आमच्यासारखा देश तुमच्यासारख्या देशासोबत कोणत्याही परिस्थितीत करार करणार नाही, असे त्यांनी ठासून सांगितले. या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत असून, संघर्षविरामाच्या शक्यता सध्या तरी धूसर झाल्याचे चित्र आहे.


पाकच्या जहाजांना होर्मूझमधून जाण्यास रोखले
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला बुधवारी 26 दिवस पूर्ण होत असताना परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनत आहे. या पार्श्‍वभूमीवर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने पाकिस्तानकडे निघालेल्या एका जहाजाला होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यापासून रोखल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सेलेन’ नावाचे हे जहाज कराचीकडे जात होते. मात्र, इराणी अधिकार्‍यांनी आवश्यक परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवत या जहाजाला पुढे जाण्यास मनाई करण्यात आली. आयआरजीसीचे नौदल कमांडर अलीरेझा तंगसिरी यांनी स्पष्ट केले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणार्‍या प्रत्येक जहाजाने पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS