Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावमध्ये पाच हजार घरकुले रद्द होण्याची शक्यता; ३१ मार्चपर्यंत बांधकाम सुरू न केल्यास कारवाई; पंचायत समितीचा इशारा

शेवगाव : घरकुल मंजूर होऊन वर्षभर उलटूनही बांधकामास सुरुवात न करणाऱ्या शेवगाव तालुक्यातील तब्बल ५०४६ लाभार्थ्यांवर घरकुल रद्द होण्याची टांगती तलवार लटकली आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू न करणाऱ्यांची घरकुले रद्द करण्यात येणार असून, मिळालेल्या अनुदानाची वसुलीही केली जाईल, असा स्पष्ट इशारा पंचायत समिती प्रशासनाने दिला आहे.  तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी अनुदानाचा पहिला हप्ता खात्यात जमा होऊनही घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. २५, २६, २७ फेब्रुवारी तसेच १३ मार्च रोजी विविध गावांमध्ये विशेष पथकांद्वारे पाहणी करण्यात आली.  राक्षी, मुंगी, लाडजळगाव, हातगाव आणि बालमटाकळी या ग्रामपंचायत हद्दीत १० विशेष पथकांनी लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन कामाची स्थिती तपासली. अनेक ठिकाणी निधी मिळूनही पायाभरणीही न झाल्याचे आढळून आल्याने अधिकारी संतप्त झाले आहेत.  याबाबत शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शाहा यांनी सांगितले की, निर्धारित मुदतीत काम सुरू न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. संबंधित लाभार्थ्यांकडून निधी परत घेतला जाईल आणि त्यांचे घरकुल मंजुरी आदेश रद्द करण्यात येतील.  दरम्यान, प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अनेकांनी तत्काळ बांधकाम सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

एकनाथ वाडी-पाथर्डी बस सेवा सुरू करा; नागरिकांची मागणी ; आंदोलनाचा इशारा
४५ गावांच्या पाणीपुरवठ्याचे स्वागत; मात्र १३ गावांच्या योजनेवर परिणाम नको : काकडे
खर्ड्यामध्ये कांद्याच्या पिकात अफूची शेती; दोघांविरोधात गुन्हा ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

शेवगाव : घरकुल मंजूर होऊन वर्षभर उलटूनही बांधकामास सुरुवात न करणाऱ्या शेवगाव तालुक्यातील तब्बल ५०४६ लाभार्थ्यांवर घरकुल रद्द होण्याची टांगती तलवार लटकली आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू न करणाऱ्यांची घरकुले रद्द करण्यात येणार असून, मिळालेल्या अनुदानाची वसुलीही केली जाईल, असा स्पष्ट इशारा पंचायत समिती प्रशासनाने दिला आहे.

 तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी अनुदानाचा पहिला हप्ता खात्यात जमा होऊनही घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. २५, २६, २७ फेब्रुवारी तसेच १३ मार्च रोजी विविध गावांमध्ये विशेष पथकांद्वारे पाहणी करण्यात आली.

 राक्षी, मुंगी, लाडजळगाव, हातगाव आणि बालमटाकळी या ग्रामपंचायत हद्दीत १० विशेष पथकांनी लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन कामाची स्थिती तपासली. अनेक ठिकाणी निधी मिळूनही पायाभरणीही न झाल्याचे आढळून आल्याने अधिकारी संतप्त झाले आहेत.

 याबाबत शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शाहा यांनी सांगितले की, निर्धारित मुदतीत काम सुरू न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. संबंधित लाभार्थ्यांकडून निधी परत घेतला जाईल आणि त्यांचे घरकुल मंजुरी आदेश रद्द करण्यात येतील.

 दरम्यान, प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अनेकांनी तत्काळ बांधकाम सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

COMMENTS