भातकुडगाव फाटा : जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त व शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी मुंबई येथील विधानभवन अधिवेशनादरम्यान राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत अहिल्यानगरमधील शैक्षणिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. या वेळी मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) विषयावरील विशेष प्रॅक्टिकल कार्यशाळेबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची प्रॅक्टिकल कार्यशाळा राबवून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे दिल्याबद्दल मंत्री बावनकुळे यांनी डॉ. घुले पाटील यांचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान व डेटा सायन्स विभागाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत नामांकित आयटी कंपन्यांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि त्याचे भविष्यातील उपयोग समजावून सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. दरम्यान, आगामी काळात अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली. या परिषदेस प्रमुख उपस्थिती लावण्याचे निमंत्रण डॉ. घुले पाटील यांनी मंत्री बावनकुळे यांना दिले. त्यावर मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. “तंत्रज्ञानाच्या युगात आपले विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय सदैव नवनवीन प्रयोग करत राहील. एआय कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनानंतर आता मोठ्या स्तरावर शैक्षणिक परिषदा भरवण्याचा आमचा मानस आहे.” — डॉ. क्षितिज घुले पाटील (विश्वस्त, जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव-ने, संचलित.)

भातकुडगाव फाटा : जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त व शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी मुंबई येथील विधानभवन अधिवेशनादरम्यान राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत अहिल्यानगरमधील शैक्षणिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) विषयावरील विशेष प्रॅक्टिकल कार्यशाळेबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची प्रॅक्टिकल कार्यशाळा राबवून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे दिल्याबद्दल मंत्री बावनकुळे यांनी डॉ. घुले पाटील यांचे कौतुक केले.
महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान व डेटा सायन्स विभागाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत नामांकित आयटी कंपन्यांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि त्याचे भविष्यातील उपयोग समजावून सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
दरम्यान, आगामी काळात अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली. या परिषदेस प्रमुख उपस्थिती लावण्याचे निमंत्रण डॉ. घुले पाटील यांनी मंत्री बावनकुळे यांना दिले. त्यावर मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
“तंत्रज्ञानाच्या युगात आपले विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय सदैव नवनवीन प्रयोग करत राहील. एआय कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनानंतर आता मोठ्या स्तरावर शैक्षणिक परिषदा भरवण्याचा आमचा मानस आहे.”
— डॉ. क्षितिज घुले पाटील (विश्वस्त, जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव-ने, संचलित.)

COMMENTS