Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजभवनाचा सन्मान; रजनीताई पाटील राज्यसभेच्या पिठासीन अधिकारीपदी विराजमान

केज : महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्या आणि खासदार रजनीताई पाटील यांना राज्यसभेत अत्यंत मानाचा सन्मान मिळाला आहे. काल राज्यसभा मध्ये पिठ

शेतकरी, बेरोजगारी अन् बीडच्या विकासावर खा.सोनवणेंनी संसदेत उठविला आवाज; लोकसभा अध्यक्षाविरूध्द आलेल्या अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थही केले मुद्देसूद भाषण
गेवराईच्या सांस्कृतिक परंपरेला आर्ट ऑफ फन अकॅडमीने नवसंजीवनी दिली- गीताभाभी बाळराजे दादा पवार; आर्ट ऑफ फन अकॅडमीचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
लिंबागणेशमध्ये शेतकरी सहवेदना दिवस पाळला; आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना श्रद्धांजली

केज : महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्या आणि खासदार रजनीताई पाटील यांना राज्यसभेत अत्यंत मानाचा सन्मान मिळाला आहे. काल राज्यसभा मध्ये पिठासीन अधिकारी म्हणून त्यांनी सभागृहाचे यशस्वी संचालन केले.
उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालवण्याची जबाबदारी अनुभवी सदस्यांवर सोपवली जाते. या पार्श्वभूमीवर रजनीताई पाटील यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी प्रश्नोत्तराचा तास, विविध विधेयकांवरील चर्चा तसेच सभागृहातील शिस्त अत्यंत संयमाने आणि नियमांचे काटेकोर पालन करत प्रभावीपणे हाताळली. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी याच सभागृहात त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा त्याच सभागृहाचे संचालन करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येणे, हा त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. संघर्षातून उभ्या राहिलेल्या या प्रवासामुळे त्यांच्या नेतृत्वगुणांची पुन्हा एकदा प्रचिती आली. एका मराठी महिला नेत्या म्हणून रजनीताई पाटील यांना मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद मानला जात असून, राज्यातील राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

COMMENTS