श्रीगोंदा : टाकळी कडेवळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अशोक नवले यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. सोसायटीच्या निवडणुकीत ऍड. अ

श्रीगोंदा : टाकळी कडेवळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत अशोक नवले यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. सोसायटीच्या निवडणुकीत ऍड. अशोक वाळुंज गटाचे आठ उमेदवार विजयी झाले, तर विरोधी गटाचे पाच उमेदवार निवडून आले. मात्र, बहुमत मिळूनही सत्तेचा एकतर्फी वापर न करता “सर्वांना पदाचा सन्मान मिळावा” या भूमिकेतून एकमताने निर्णय घेण्यात आला. यासाठी पदांची कालमर्यादा निश्चित करून रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या निर्णयातून पारंपरिक सहकार तत्त्वांना आधुनिक दृष्टीकोनाची जोड देण्यात आली.
ठरलेल्या रोटेशननुसार २३ मे २०२२ रोजी विठ्ठल वाळुंज यांनी चेअरमनपद भूषविले, तर कांचन नवले व्हाइस चेअरमन झाल्या. त्यानंतर १९ जून २०२४ रोजी नितीन वाळुंज यांना संधी देण्यात आली आणि सुभाष वाळुंज व्हाइस चेअरमन झाले. पुढे १२ ऑगस्ट २०२५ रोजी अशोक सोनवने यांची निवड झाली. या क्रमाने आता अशोक नवले यांची बहुमताने निवड निश्चित झाली आहे. निवड प्रक्रियेत अशोक नवले यांच्या एकमेव अर्जाला विठ्ठल वाळुंज आणि नितीन वाळुंज यांनी सूचक व अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला.
यावेळी कांचन नवले, संगीता वाळुंज, अशोक सोनवने, विठ्ठल वाळुंज, सुभाष वाळुंज, महेश भिसे, नितीन वाळुंज यांच्यासह दादा नेटके, अंकुश नवले, फक्कड वाळुंज, अमृत नवले, शरद घोलप, विजयशीह नवले, शैलेश घोलप, तात्या भिसे, नवनाथ वाळुंज, अतुल नवले, सुनील वराळे, सुदाम खामकर, पत्रकार दादा सोनवने उपस्थित होते.
ही निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक नारायण परजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. पी. मुंडे, तर सह निवडणूक अधिकारी म्हणून सुरेश दिवटे यांनी जबाबदारी पार पाडली. या निवडीने सहकार क्षेत्रात सकारात्मक संदेश गेला असून, इतर संस्थांसाठीही हा एक अनुकरणीय आदर्श ठरत आहे.

COMMENTS