Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांचा भत्ता 50 हजार करण्याचा प्रस्ताव

राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून सध्या दिला जाणारा भत्ता

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने गौरव
श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयात महिला दिन उत्साहात
दरडगाव थडी येथे 40 वर्षीय महिलेचा मृत्यू


राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून सध्या दिला जाणारा भत्ता 15 हजार वरून 50 हजार पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला. मंत्री शिरसाट म्हणाले, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या संदर्भात समितीचा अहवाल प्रलंबित असून तो प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. 2025-26  वर्षासाठी या योजनेसाठी 7.15 कोटींची तरतूद करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांना लाभ दिला जात आहे.

COMMENTS