Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक

शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव परिसरात घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या दोन परस्परविरोधी गुन्ह्यांमध्ये शेवगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अटक केली आहे.  १५ मार्च रोजी बोधेगाव दुर्गक्षेत्रात पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे व त्याच्या साथीदारांनी गणेश रमेश कापसे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गणेश रमेश कापसे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी भारत ज्ञानदेव कापसे (रा. अंतरवली बृ., ता. शेवगाव) याचा शोध घेत असताना तो घराजवळील मक्याच्या शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच  पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे करीत आहेत.  दरम्यान, दुसऱ्या घटनेत पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे हा आपल्या चारचाकी वाहनात डिझेल भरून मित्रांसह चहा पिण्यासाठी बोधेगाव येथील मुंडे चौकात थांबला असता नितीन मनोहर काकडे, संग्राम नितीन काकडे, दत्तात्रय हरीचंद्र तहकिक व राजू बागवान यांनी त्याच्यावर लोखंडी गजाने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिन्या उर्फ सुरेश कापसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय हरीचंद्र तहकिक (रा. लाडजळगाव, ता. शेवगाव) याला लाडजळगावकडे पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले करीत आहेत.  ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक रामहारी खेडकर, बाजीराव सानप, आजिनाथ कोठाळे, प्रवीण महाले तसेच शेवगाव पोलीस ठाणे व नगर दक्षिण सायबर सेलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

मनपाचे १७१० कोटींचे अंदाजपत्रक सादर; सीना नदी कामांसाठी २० कोटी; ४० ई-बस ; शहरात ५०४ घरकुलांचे अपार्टमेंट
आंबीजळगावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, ५८ हजारांचा ऐवज लंपास
संगमनेरमध्ये तरुणीवर चाकूने वार; हल्लेखोराने शेततळ्यात घेतली उडी

शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव परिसरात घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या दोन परस्परविरोधी गुन्ह्यांमध्ये शेवगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अटक केली आहे.

 १५ मार्च रोजी बोधेगाव दुर्गक्षेत्रात पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे व त्याच्या साथीदारांनी गणेश रमेश कापसे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गणेश रमेश कापसे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी भारत ज्ञानदेव कापसे (रा. अंतरवली बृ., ता. शेवगाव) याचा शोध घेत असताना तो घराजवळील मक्याच्या शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच  पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे करीत आहेत.

 दरम्यान, दुसऱ्या घटनेत पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे हा आपल्या चारचाकी वाहनात डिझेल भरून मित्रांसह चहा पिण्यासाठी बोधेगाव येथील मुंडे चौकात थांबला असता नितीन मनोहर काकडे, संग्राम नितीन काकडे, दत्तात्रय हरीचंद्र तहकिक व राजू बागवान यांनी त्याच्यावर लोखंडी गजाने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिन्या उर्फ सुरेश कापसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय हरीचंद्र तहकिक (रा. लाडजळगाव, ता. शेवगाव) याला लाडजळगावकडे पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले करीत आहेत.

 ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक रामहारी खेडकर, बाजीराव सानप, आजिनाथ कोठाळे, प्रवीण महाले तसेच शेवगाव पोलीस ठाणे व नगर दक्षिण सायबर सेलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

COMMENTS