सायंकाळच्या लोडशेडिंगच्या वेळेत बदल करा; खा. लंके यांची अधीक्षक अभियंत्यांकडे मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सायंकाळच्या लोडशेडिंगच्या वेळेत बदल करा; खा. लंके यांची अधीक्षक अभियंत्यांकडे मागणी

अहिल्यानगर : अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या सिंगल फेज वीज लोडशेडिंगच्या वेळेबाबत खासदार नीलेश लंके यांनी महावितरण प्रशासनाकडे तातडीने बदल करण्याची मागणी केली आहे. सध्या मतदारसंघातील बहुतांश भागामध्ये सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० या कालावधीत सिंगल फेज वीज लोडशेडिंग करण्यात येत आहे. ही वेळ नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाची असून या काळात वीज नसल्याने सर्वसामान्य जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  सध्या शालेय परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक वीजपुरवठा मिळत नाही. तसेच सायंकाळची वेळ ही स्वयंपाकाची असल्याने गृहिणींनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, काही भागांमध्ये बिबट्याचा वावर असल्याने अंधाराच्या वेळेत नागरिकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.  या संदर्भात मतदारसंघातील नागरिकांनी लेखी तसेच प्रत्यक्ष भेटून अनेक तक्रारी केल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० या वेळेत होणाऱ्या लोडशेडिंगच्या वेळेत तातडीने बदल करून ते दिवसा करण्यात यावे, अशी मागणी खासदार लंके यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन महावितरण प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

माळीवाडा वेस न पाडता तिचे जतन करावे; खा. लंके यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक
समाजसेवक देडगांवकरांचा ४६ वर्षांच्या समाजसेवेबद्दल सन्मान  
The current image has no alternative text. The file name is: nilesh-lanke-speech-n4_2024121350051.jpg

अहिल्यानगर : अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या सिंगल फेज वीज लोडशेडिंगच्या वेळेबाबत खासदार नीलेश लंके यांनी महावितरण प्रशासनाकडे तातडीने बदल करण्याची मागणी केली आहे.

सध्या मतदारसंघातील बहुतांश भागामध्ये सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० या कालावधीत सिंगल फेज वीज लोडशेडिंग करण्यात येत आहे. ही वेळ नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाची असून या काळात वीज नसल्याने सर्वसामान्य जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 सध्या शालेय परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक वीजपुरवठा मिळत नाही. तसेच सायंकाळची वेळ ही स्वयंपाकाची असल्याने गृहिणींनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, काही भागांमध्ये बिबट्याचा वावर असल्याने अंधाराच्या वेळेत नागरिकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 या संदर्भात मतदारसंघातील नागरिकांनी लेखी तसेच प्रत्यक्ष भेटून अनेक तक्रारी केल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० या वेळेत होणाऱ्या लोडशेडिंगच्या वेळेत तातडीने बदल करून ते दिवसा करण्यात यावे, अशी मागणी खासदार लंके यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन महावितरण प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS