Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेत ‘फुलोकी होली’ समारंभ उत्साहात

अकोले : येथील माहेश्‍वरी महिला मंडळाच्या वतीने 'फुलोकी होली' चा समारंभ उत्साहात संपन्न झाला. यामध्ये समाज बंधूभगिनींसह युवा मोठ्या संख्येने सहभाग

सनातन संस्कृती कधीही नाश पावणारी नाही : महंत रामगिरीजी महाराज
लोंढे मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
संगमनेरमध्ये तरुणीवर चाकूने वार; हल्लेखोराने शेततळ्यात घेतली उडी

अकोले : येथील माहेश्‍वरी महिला मंडळाच्या वतीने ‘फुलोकी होली’ चा समारंभ उत्साहात संपन्न झाला. यामध्ये समाज बंधूभगिनींसह युवा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अकोले शहर ब्रजधाम बनले होते.

 आकर्षक सजावट, मनमोहक वेशभूषा यामुळे परिसर ब्रजधान बनला होता. अशा वातावरणात कृष्णाच्या वेशभूषेत भाग्यश्री डांगरा, तर राधाच्या वेशभूषेत योगिता सारडा यांच्या आगमनाने सर्वांचे मन जिंकले. या मनमोहक वातावरणात सादर केलेल्या रास लिलाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रेरणा वर्मा,  रोहिणी मणियार,  स्वाती बुब,  दामिनी मुंदडा, भाग्यश्री डांगरा, योगिता सारडा यांनी नृत्य प्रस्तुत केले.

 तर निरज मुंदडा, गोपाल बुब, सर्वेश डांगरा यांनी आपल्या मधुर वाणीमध्ये भजन प्रस्तुत केले. त्याचसोबत  तृप्ती सारडा, प्रेरणा वर्मा,  जयश्री मुंदडा यांच्या नियोजनात ग्रुप गेम्स देखील घेण्यात आले. सोबतच ठंडाईचा आस्वादाने फुलो की होली चा उत्सव अविस्मरणीय ठरला.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका महिला संगठनच्या पदाधिकारी अध्यक्षा प्रियंका बुब, उपाध्यक्षा  जयश्री मुंदडा, सेक्रेटरी तृप्ती सारडा,  सह-सेक्रेटरी प्रेरणा वर्मा, कोषाध्यक्षा ज्योती सारडा, प्रसिद्धी प्रमुख  ज्योती जाजू  यांचेसह आकाश सारडा, निरज सारडा, गोपाल बुब, योगेश मुंदडा, सर्वेश डांगरा, अल्पेश सारडा, चेतन बुब, सुनीता राठी, ऋतुजा सारडा, सुवर्णा साकी, वैशाली राठी,  स्वाती सारडा यांनी विशेष परिश्रम घेतले. समारंभाचे सूत्रसंचालन प्रियंका बुब व तृप्ती सारडा यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS