राहाता : शिर्डी व परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या दलित, वंचित, उपेक्षित व अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांच्या घरांवर कारवाया करून त्यांना बेघर केले जात असल्याचा आरोप करत अशा कारवाया तातडीने थांबवाव्यात, तसेच ६० ते ७० वर्षांपासून एकाच ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्याच जागेचा स्वतंत्र सातबारा देण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर परिसर, देशमुख चारी, निमगाव, सावळीविहीर आदी ठिकाणी अनेक कुटुंबे गेल्या ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र अलीकडे प्रशासनाकडून जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने या ठिकाणची घरे पाडण्यात आल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या कारवाईमुळे परिसरातील वातावरण भावनिक व संतापजनक बनले असून प्रभावित कुटुंबांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. घरे जमीनदोस्त झाल्याने अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत अश्रू असून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. काही कुटुंबे चार-पाच पिढ्यांपासून या ठिकाणी राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या आयुष्याचा आधारच कोसळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी लक्ष्मीनगर व परिसरातील कारवाई झालेल्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी प्रभावित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला. यावेळी बोलताना डॉ. पिपाडा म्हणाले, की मानवतेच्या दृष्टीने बेघर झालेल्या कुटुंबांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रश्नाचा पाठपुरावा मुख्यमंत्री स्तरावर करण्यात येईल. तसेच प्रभावित नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संबंधित प्रशासनानेही या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहून बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या प्रश्नावर शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन डॉ. पिपाडा यांनी दिल्याने प्रभावित नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राहाता : शिर्डी व परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या दलित, वंचित, उपेक्षित व अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांच्या घरांवर कारवाया करून त्यांना बेघर केले जात असल्याचा आरोप करत अशा कारवाया तातडीने थांबवाव्यात, तसेच ६० ते ७० वर्षांपासून एकाच ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्याच जागेचा स्वतंत्र सातबारा देण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर परिसर, देशमुख चारी, निमगाव, सावळीविहीर आदी ठिकाणी अनेक कुटुंबे गेल्या ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र अलीकडे प्रशासनाकडून जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने या ठिकाणची घरे पाडण्यात आल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या कारवाईमुळे परिसरातील वातावरण भावनिक व संतापजनक बनले असून प्रभावित कुटुंबांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
घरे जमीनदोस्त झाल्याने अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत अश्रू असून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. काही कुटुंबे चार-पाच पिढ्यांपासून या ठिकाणी राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या आयुष्याचा आधारच कोसळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी लक्ष्मीनगर व परिसरातील कारवाई झालेल्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी प्रभावित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला.
यावेळी बोलताना डॉ. पिपाडा म्हणाले, की मानवतेच्या दृष्टीने बेघर झालेल्या कुटुंबांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रश्नाचा पाठपुरावा मुख्यमंत्री स्तरावर करण्यात येईल. तसेच प्रभावित नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
संबंधित प्रशासनानेही या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहून बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या प्रश्नावर शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन डॉ. पिपाडा यांनी दिल्याने प्रभावित नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS