Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नियम व अटी पूर्ण केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी : मंत्री उदय सामंत

मुंबई : गुंठेवारी नियमितीकरणासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक असून संबंधित निकष पूर्ण करणार्‍या प्रस्तावांनाच मंजुरी

देशात खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; इराण-इस्त्रायल युद्धामुळे खत आयातीवर होणार परिणाम
शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड; कोळगावात महिला ग्रामसभेचा निर्णय
टोमॅटोचे भाव कोसळले; लाल चिखल शेतकर्‍यांच्या नशिबी; कष्टांचे मोल न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी रस्त्यावर टाकला माल

मुंबई : गुंठेवारी नियमितीकरणासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक असून संबंधित निकष पूर्ण करणार्‍या प्रस्तावांनाच मंजुरी दिली जाते. आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक अटी पूर्ण न झाल्यास संबंधित प्रस्ताव नाकारले जातात. त्यामुळे गुंठेवारी विकास नियमित करण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेत सदस्य योगेश टिळेकर यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती. यावेळी चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी सहभाग घेतला. मंत्री डॉ. सामंत म्हणाले, राज्य शासनाने 30 एप्रिल 2001 पासून संपूर्ण महाराष्ट्रात गुंठेवारी विकास नियमितीकरणाचा अधिनियम लागू केला असून त्यानुसार पुणे महानगरपालिकेने शहर सुधारणा समितीमार्फत 12 फेब्रुवारी 2021 रोजी ठराव करून गुंठेवारी विकास नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात आतापर्यंत 1133 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 40 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. 731 प्रस्ताव नाकारण्यात आले असून 327 प्रस्तावांवर सध्या कार्यवाही सुरू आहे.

COMMENTS