Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभरात गॅस सिलेंडरसाठी रांगाच-रांगा; अनेक राज्यांत गॅसचा पुरवठा विस्कळीत

नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षाचा परिणाम भारतातही जाणवू लागला असून देशातील अनेक राज्यांत एलपीजी गॅसचा पुरवठा

मला असं वाटतंय की लंपी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा
खड्डय़ांमुळे तीन चाकी मालवाहू टेम्पो पलटला.
जीवनात प्रकाश निर्माण करणार्‍या हेल्पिंग हँड्स संस्थेचे हे कार्य गौरवास्पदः सुपेकर

नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षाचा परिणाम भारतातही जाणवू लागला असून देशातील अनेक राज्यांत एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरती मर्यादा घालण्यात आल्याने हॉटेल व भोजनालयांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबल्याने सर्वाधिक अडचण हॉटेल व भोजन व्यवसायाशी संबंधित लोकांना भेडसावत आहे. घरगुती गॅस मिळवण्यासाठीही नागरिकांना मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी एजन्सीसमोर पहाटेपासूनच लोकांची गर्दी होत असून सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत तासनतास थांबावे लागत आहे. मध्य प्रदेशात गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने केटरिंग व्यवसायावर मोठे संकट आले आहे. भोपाळमध्ये पुढील काही दिवसांत हजाराहून अधिक लग्नसमारंभ नियोजित असल्याने आयोजक आणि केटरर्स चिंतेत आहेत. गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाकाची व्यवस्था कशी करायची, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला असून केटरर्सनी परिस्थितीला आणीबाणी सदृश असे वर्णन केले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने तीन तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करून पुरवठा स्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गॅस साठेबाजी रोखण्यासाठी देशभरात अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या तरतुदींचा वापर करण्यात येत आहे. घरगुती गॅस सिलिंडर मिळाल्यानंतर पुढील बुकिंग किमान 25 दिवसांनंतरच करता येईल, असा नवा नियम लागू करण्यात आला आहे. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी ओटीपी किंवा जैवमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. तेल शुद्धीकरण केंद्रांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले असून उत्पादनात सुमारे दहा टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रेस्टॉरंट संघटनांशी चर्चेची तयारी
व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत रेस्टॉरंट आणि भोजन व्यवसायिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या समितीत आहेत. ही समिती व्यावसायिक गरजांचा आढावा घेऊन पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमात आवश्यक बदल सुचवणार आहे.

गॅस सिलेंडरची गाडी चोरीला, मंत्रालयाची कॅन्टीन बंद : वडेट्टीवार
राज्यात गॅस सिलिंडर वाहतूक करणारी एक गाडी चोरीला गेल्याची घटना घडल्याची काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत सरकारने तातडीने परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली.काल उशिरापर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू असतानाही आमदारांसाठी कॅन्टीनमध्ये जेवणाची सोय उपलब्ध नव्हती. बुधवारीही मंत्रालयातील कॅन्टीनही बंद राहिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील अनेक हॉटेल्सना गॅसच्या कमतरतेचा फटका बसत असून काही ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवावी लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.

COMMENTS