तेहरान : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला मंगळवारी अकरावा दिवस लागला आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या महिला फुटबॉल संघा

तेहरान : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला मंगळवारी अकरावा दिवस लागला आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या महिला फुटबॉल संघातील पाच खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने मानवतावादी कारणास्तव आश्रय देत तेथे राहण्याची परवानगी दिली आहे. आशियाई स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर या खेळाडूंना मानवतावादी व्हिसा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाविरुद्ध होणार्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले नव्हते. या कृतीमुळे देशात मोठा वाद निर्माण झाला. काही कट्टर गटांनी त्यांना देशद्रोही ठरवत कठोर शिक्षेची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. रविवारी गोल्ड कोस्ट येथील मैदानाबाहेर शेकडो नागरिकांनी एकत्र येत या खेळाडूंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आमच्या मुलींना वाचवा अशा घोषणा देत त्यांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, सुरू असलेल्या संघर्षामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या दहा दिवसांत युद्धाचा परिणाम अनेक देशांतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला असून सामान्य जनतेसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. युद्धाचे विविध परिणाम आणि परिस्थितीतील बदल जगभरातील माध्यमांतून समोर येत आहेत.

COMMENTS