Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला दिनानिमित्त रयत प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

नवजात कन्यांच्या मातांचा साडी-चोळी व बेबी किट देऊन सन्मान बीड । प्रतिनिधीजागतिक महिला दिनानिमित्त रयत सामाजिक प्रतिष्ठान, बीड (महाराष्ट्

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखा; शिवसेनेचा नगरपालिकेवर आंदोलनाचा इशारा
श्रीक्षेत्र दत्त मंदिराला जाण्यासाठी पायर्‍यांचे बांधकाम पूर्ण; 9 फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा
जिल्हापरिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय अधिकार्‍यांचा मनमानी कारभार

नवजात कन्यांच्या मातांचा साडी-चोळी व बेबी किट देऊन सन्मान

बीड । प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त रयत सामाजिक प्रतिष्ठान, बीड (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने 7 व 8 मार्च रोजी एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. बीड येथील शासकीय रुग्णालयात या दिवशी जन्मलेल्या नवजात कन्यांच्या मातांचा साडी-चोळी देऊन तसेच बाळांना बेबी किट देऊन सन्मान करण्यात आला.

समाजात मुलींचा सन्मान आणि कन्यारत्नाचे स्वागत व्हावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन रोहिणीताई गणेश माने, शुभांगी दिनेश माने व सुलोचना हनुमंतराव माने यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून गिरी मॅडम उपस्थित होत्या. तसेच रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या विधी सल्लागार संगीता धसे, चव्हाण ताई, समाजसेविका मीनाक्षी डोमाळे (देवकते), कावेरी जाधव, प्रांजल माने यांच्यासह प्रतिष्ठानच्या इतर महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे नवजात कन्यांच्या मातांना सन्मानित करत महिला दिनाचे औचित्य साधण्यात आले असून, उपस्थितांनी रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

COMMENTS