Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवाभाऊंमुळे कोपरगाव पोलिसांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद : माजी आ. कोल्हे

कोपरगाव : कोपरगाव तालुका पोलिस ठाणे इमारत आणि 64 पोलिस कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावे

जनहिताला पहिल्याच दिवशी काळे गटाकडून मिठाचा खडा :  सोनवणे
पोलीस ठाण्याची इमारत ही आपल्या सुरक्षितेची हमी -आ. काळे 
कांद्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घ्यावी

कोपरगाव : कोपरगाव तालुका पोलिस ठाणे इमारत आणि 64 पोलिस कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना स्नेहलता कोल्हे, म्हणाल्या या वास्तूचे उद्घाटन होणे हा आनंदाचा क्षण ठरला. शहर आणि ग्रामीण पोलिस ठाणे वेगळे झाले. इमारतीची अतिशय दुरावस्था झाली होती.  त्यामुळे यासाठी पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

ग्रामीण आणि शहर पोलिस स्टेशन वेगळे करून जनतेला सोयीस्कर सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न केले. पोलिस कर्मचारी वसाहतीत गेल्यानंतर प्रत्यक्ष स्थिती पाहून मला विधानसभा सदस्य असताना वाईट वाटले व ही परिस्थिती मुख्यमंत्री देवाभाऊंना कळवली त्यानंतर त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून नवीन इमारती आणि कर्मचारी वसाहत यासाठी मंजुरी देत या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या असे कोल्हे यांनी सांगितले.

 यावेळी आ.आशुतोष काळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, नगराध्यक्ष पराग संधान, पोलिस निरीक्षक ग्रामीण संदीप कोळी,शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदींसह पोलिस अधिकारी कर्मचारी, सहकार महर्षी कोल्हे कारखाना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे व सर्व संचालक,भाजपा तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे व पदाधिकारी यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS