Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळगाव राजवाडी येथील जय केदारनाथ आश्रम शाळेत बोगस विद्यार्थ्यांचा घोटाळा?

तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी नांदेड । प्रतिनिधी हदगाव तालुक्यातील पिंपळगाव राजवाडी फाटा, येवली तांडा येथील जय केदारनाथ केंद्रीय अनुसूचित जाती आश

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी भाजपात विसंवादाचा भडका !
मानवतेची महान सेवा – जीवनदान देणार्‍या एम्ब्युलन्स सेवेचा भोकरमध्ये भव्य शुभारंभ
वनविकास महामंडळ की ‘वनविनाश’ महामंडळ?किनवटमधील 15 हजार हेक्टर जंगल धोक्यात; कार्यालय हटवण्याची मागणी

तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी
नांदेड । प्रतिनिधी
हदगाव तालुक्यातील पिंपळगाव राजवाडी फाटा, येवली तांडा येथील जय केदारनाथ केंद्रीय अनुसूचित जाती आश्रम शाळा गंभीर अनियमिततेच्या भोवर्‍यात सापडली असून, गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद असतानाही पटसंख्या फुगवून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप समोर आला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या सलग तीन वर्षांत बोगस टीसीच्या प्रती व आधार कार्ड तयार करून विद्यार्थ्यांची खोटी नोंदणी यु-डायस (ण-ऊखडए) संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
निर्गम उतार्‍यानुसार चौकशी करून संबंधित बोगस विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गात पटसंख्या असल्याचे दाखवून शासन व प्रशासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप आहे. बोगस टीसी व आधार कार्ड तयार करून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा प्रकार हा केवळ प्रशासकीय नियमभंग नसून गंभीर फौजदारी गुन्हा असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकांसह दोषी आढळणार्‍या संबंधितांवर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड तसेच सहाय्यक समाज कल्याण आयुक्त, नांदेड आणि जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संबंधित शाळेची सर्व कागदपत्रे – निर्गम उतारे, टीसी बुक, टीसी फाईल व इतर दस्तऐवज – तात्काळ ताब्यात घ्यावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहातील परिस्थितीही अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. काही खोल्यांमध्ये फॅनची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून, काही विद्यार्थी आजारी पडल्याची माहिती आहे. शिक्षण आणि निवास या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ कागदोपत्री पटसंख्या वाढवण्याचा उद्योग सुरू होता का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. लहुजी टायगर फोर्स महाराष्ट्राचे संस्थापक वि. मा. शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आश्रम शाळांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणार्‍यांना पाठीशी घालणार्‍यांवरही कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. एकीकडे शिक्षणाच्या गुणवत्तेचा गजर केला जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारे बोगस नोंदी करून शासनाची फसवणूक होत असेल तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आता प्रशासन या प्रकरणात किती वेगाने आणि किती कठोर पावले उचलते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सदर विनाअनुदानित आश्रम शाळा ही समाज कल्याण विभागाच्या प्रशासकीय अखत्यारीत येत नसून, आमच्या विभागांतर्गत नोंदणीकृत अथवा अनुदानित शाळांच्या अधिकृत यादीत त्या संस्थेचे नाव समाविष्ट नाही. परिणामी, संबंधित शाळेच्या कार्यपद्धती, व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार किंवा शैक्षणिक स्थितीविषयी कोणतीही अधिकृत माहिती आमच्या कार्यालयाकडे उपलब्ध नाही. विभागाच्या नोंदी व अधिकार क्षेत्राच्या चौकटीतच आम्ही माहिती देऊ शकतो, याची नोंद घ्यावी. संबंधित बाब ही इतर सक्षम प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असण्याची शक्यता असून, त्यांच्याकडे आवश्यक ती विचारणा करावी, असे नम्रपणे कळविण्यात येते.
– सह समाज कल्याण आयुक्त, शिवानंद मिनगिरे

COMMENTS