Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंचशील नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची निवड

जिल्ह्यातील पहिली ‘डी.जे. (डॉल्बी) मुक्त’ जयंती साजरी करण्याचा आदर्श निर्णयबीड । प्रतिनिधीमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव 2026

Beed : वीरशैव समाजाचा आधारवड कोसळला
Beed : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन ! (Video)
Beed : “आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं” जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात रिपाईचे आंदोलन| LOK News24

जिल्ह्यातील पहिली ‘डी.जे. (डॉल्बी) मुक्त’ जयंती साजरी करण्याचा आदर्श निर्णय
बीड । प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव 2026 निमित्त पंचशील नगर, बीड येथे उत्सव समितीच्या नव्या कार्यकारिणीची निवड उत्साहात पार पडली. त्रिरत्न बौद्ध विहार, पंचशील नगर येथे नगरसेवक प्रमोद (आण्णा) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.
बैठकीत यंदाची जयंती भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तसेच शहरातील पहिली ‘डी.जे. (डॉल्बी) मुक्त’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ध्वनीप्रदूषणाला आळा घालत विचारप्रधान, प्रबोधनपर आणि सामाजिक संदेश देणारा उत्सव साजरा करण्याचा हा आदर्श उपक्रम ठरणार आहे. अध्यक्ष: ड.तेजस वडमारे,उपाध्यक्ष:तेजस खरात,सचिव: अशोक जावळे,सहसचिव: मयंक जाधव,कोषाध्यक्ष: शुभम सोनवणे,कार्याध्यक्ष: आनंद खेमाडे सदस्य: आदेश मगर, संजय ठोकळ, विजय विद्यागार, ओंकार सोनवणे ही निवड सर्वानुमते करण्यात आली. बैठकीस प्रमुख मार्गदर्शन म्हणून नगरसेवक प्रमोद (आण्णा) शिंदे यांच्यासह संजय मिसाळ, महेंद्र वडमारे, संतोष जोगदंड, के. के. वडमारे, मीना (ताई) मस्के, अलका (ताई) डोंगरे व वंदना (ताई) पंडित उपस्थित होते. यंदाच्या जयंतीचा मुख्य उद्देश म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजजागृती करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला.यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, दानदाते, समाजबांधव व महिला मंडळ उपस्थित होते.आपण सर्वांनी मिळून हा उत्सव अभूतपूर्व, विचारप्रधान आणि समाजासाठी प्रेरणादायी करूया, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

COMMENTS