Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावे समोर येतील ः मनोज जरांगे यांचा दावा

बीड : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तपास निर्णायक टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठ

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संघात आदित्य कृषी महाविद्यालयाचा डंका
केजमध्ये जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात संपन्न; मान्यवरांची मांदियाळी
31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभास उपस्थित रहावे-वैभव स्वामी

बीड : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तपास निर्णायक टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. लवकरच काही प्रभावशाली नावे समोर येऊ शकतात, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला घटनेबाबत विविध तर्क मांडले गेले; मात्र कुटुंबीयांनी हा अपघात नसून नियोजित कट असल्याचा आरोप करत निष्पक्ष तपासाची मागणी केली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. तपासादरम्यान काही संशयितांची नार्को व मेंदू नकाशा चाचणी करण्यात आली. या चाचण्यांचे अहवाल तपास यंत्रणेकडे प्राप्त झाल्याचे समजते. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची चर्चा असून तपासाची दिशा स्पष्ट होत असल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत बोलताना, तपास अंतिम टप्प्यात आहे. अहवाल न्यायालयात सादर झाल्यानंतर अनेक गोष्टी उघड होतील. काही नावे धक्कादायक असू शकतात, असे म्हटले. तथापि, तपासात अडथळा येऊ नये म्हणून संबंधित नावे सध्या जाहीर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS